Salman dances with Mamata Banerjee at KIFF Esakal
मनोरंजन

Kolkata International Film Festival 2023: चालो नाचो! दीदींना भाईजान अन् महेश भट्टनं नाचवलं, ममताजींनी धरला ठेका

कोलकाता येथे ५ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू झाला आहे.

Vaishali Patil

Salman dances with Mamata Banerjee at KIFF: कोलकाता येथे ५ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू झाला आहे. या चित्रपट महोत्सवाला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. यात सलमान खान, अनिल कपूर, महेश भट्ट, शत्रुघ्न सिन्हा, सोनाक्षी सिन्हा यांसारखे अनेक सेलिब्रिटी दिसले.

कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात ममता बॅनर्जी देखील उपस्थित राहिल्या होत्या. यावेळी ममता बॅनर्जी यांनी 'बांग्लार माटी बांग्लार जल' हे गाणे गायलं. सलमान खानने या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून केली.

सध्या या महोत्सवाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. त्यात एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घातल आहे ज्यात ममता बॅनर्जी सलमान खानसोबत डान्स करताना दिसत आहे.

या व्हिडिओत ममता बॅनर्जी स्टेजवर सलमान खान आणि महेश भट्ट यांच्यासोबत नाचताना दिसत आहेत. या व्हिडिओत ममता बॅनर्जी आणि सलमान खान सोबत अनिल कपूर, सोनाक्षी आणि शत्रुघ्न सिन्हा देखील स्टेजवर दिसत आहेत.

तर सौरव गांगुली देखील शेजारी टाळ्या वाजवताना दिसत आहे. ममता बॅनर्जींचा हा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चाहते त्याला भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाबद्दल बोलायचं झालं तर 5 डिसेंबरपासून सुरू झालेला हा चित्रपट महोत्सव 12 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. कोलकाता येथील नेताजी इनडोअर स्टेडियममध्ये या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा पार पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Oil Crisis: पाकिस्तानात पेट्रोल साठ्यावरून नवा वाद! शहबाज सरकारच्या दाव्यांची पोलखोल; फक्त इतक्या दिवसांचा स्टॉक शिल्लक...

बाबो! प्रीती झिंटानं 'इतक्या' कोटींना विकला ब्रांद्यामधला अलिशान फ्लॅट, किंमत एकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल

Latest Marathi News Live Update : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 24 मार्च रोजी होणार

T20 World Cup 2026: सर्वाधिक धावा, सर्वाधिक विकेट्स कोणाच्या नावावर? अव्वल ३मध्ये भारतीय बॅटर नाही, गोलंदाजांत एक गडी

US-Israel-Iran War: एकमेकांवरील हल्ले अजूनही सुरूच; मृतांची संख्या चौदाशेहून अधिक, इराणमध्ये मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT