Pulkit Samrat-Kriti Kharbanda Wedding 
मनोरंजन

Pulkit Samrat-Kriti Kharbanda Wedding: ठरलं! 'या' दिवशी पार पडणार पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा यांचा विवाह सोहळा

Pulkit Samrat-Kriti Kharbanda Wedding:

priyanka kulkarni

Pulkit Samrat-Kriti Kharbanda Wedding: बॉलिवूडमध्ये सध्या लग्नसराई सुरु आहे. या वर्षाच्या सुरुवातीला आमिर खानची (Aamir Khan) मुलगी आयरा खानचे लग्न थाटामाटात पार पडले. लवकरच रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) आणि जॅकी भगनानी (Jackky Bhagnani) हे विवाहबंधनात अडकणार आहेत. पुलकित सम्राट (Pulkit Samrat) आणि क्रिती खरबंदा (Kriti Kharbanda) यांचा लकरच लग्नसोहळा पार पडणार आहे. क्रिती आणि पुलकित यांचा विवाह सोहळा कधी पार पडणार आहे? जाणून घ्या...

क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट हे दोघेही बी टाऊनचे लोकप्रिय जोडपे आहेत. एकमेकांना डेट केल्यानंतर आता दोघेही लग्न करणार आहेत.काही दिवसांपूर्वी दोघांनी एंगेजमेंट केले होते,आता लवकरच दोघे लग्नगाठ बांधणार आहे.

क्रिती आणि पुलकित कधी करणार लग्न?

क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट हे मार्च 2024 मध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. रिपोर्टनुसार, 13 मार्चला क्रिती आणि पुलकित लग्नगाठ बांधणार आहे. पण या दोघांनी अद्याप त्यांच्या लग्नाच्या तारखेची माहिती चाहत्यांना दिलेली नाही.

पुलकितनं शेअर केला रोमँटिक फोटो

14 फेब्रुवारी 2024 रोजी पुलकित सम्राटने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने क्रिती खरबंदासोबतचा स्वतःचा एक रोमँटिक फोटो शेअर केला होता. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, “डांसिंग ऑन द एज ऑफ ए लीप! आय डू आय डू आय डू"

पुलकितची चुलत बहीण रिया लुथरा हिने पुलकित आणि क्रितीचे एंगेजमेंट रिंग घातलेले फोटो शेअर केले होते. या फोटोवरुन लक्षात येते की या जोडप्याचा रोका सोहळा पार पडला आहे.

पुलकितनं आधी श्वेता रोहिरासोबत लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या काही वर्षानंतर पुलकित आणि श्वेता हे एकमेकांपासून विभक्त झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare On NCP: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का? भवितव्य सांगून सुनील तटकरेंचं मोठं वक्तव्य; काय म्हणाले?

ENG vs ITA, T20 WC : इंग्लंडचा Super 8s मध्ये प्रवेश! इटलीने 'इंग्रंजां'ना शेवटपर्यंत झुंजवले, फुटबॉलच्या देशाने जिंकली मनं...

Ratnagiri CCTV Surveillanc : पोलिसांची तिसरी नजर होतेय धूसर; जिल्ह्यातील सीसीटीव्ही कॅमेरे; देखभाल दुरुस्तीचा गंभीर प्रश्न

Malegaon News : आता अवघ्या महाराष्ट्रात राबवणार 'मालेगाव शैक्षणिक पॅटर्न'; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मोठी घोषणा

Sunil Tatkare: अजितदादांचं विमान पाडलं की पडलं? तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT