Kriti Sanon Gets Body-Shamed, Netizens Make Fun Of Her  Google
मनोरंजन

'ही तर हॅंगर दिसते', परमसुंदरी कृती सनन बॉडी शेमिंगची शिकार

काही दिवसांपूर्वी कृति सननचा एक्सरसाइज करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि तिला चक्क आपल्या फिगरमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

प्रणाली मोरे

बॉलीवूड अभिनेत्री कृती सननचं(Kriti Sanon) नाव सध्या सिनेइंडस्ट्रीत जरा जास्तच चर्चेत आहे. कृती एक चांगली अभिनेत्री असण्यासोबतच तिच्या फिटनेसचे देखील गोडवे गायले जातात. कृती सननचे नेहमीच जीम जातानाचे व्हिडीओ देखील व्हायरल होताना दिसतात. पण काही दिवसांपूर्वी तिचा एक्सरसाइज करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि तिला चक्क आपल्या फिगरमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला.(Kriti Sanon Gets Body-Shamed, Netizens Make Fun Of Her)

कृति सननने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आपला एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडीओत ती बॅक स्ट्रेच करताना दिसत आहे. या व्हिडीओला पाहून अनेकांनी तिचं कौतूक केलं आहे,मात्र काही लोकांनी मात्र तिला तिच्या फिगरवरनं ट्रोल केल्याचं दिसून आलं आहे. काही नेटकऱ्यांनी कृतिला चक्क 'सपाट' म्हटलं आहे. तर कुणी ,'ही तर हॅंगर दिसते', असं खोचकपणे म्हटलं आहे.

कृती सननने हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर बॉडी शेमिंगची(Body Shaming) शिकार झाली आहे. आता कृति काही पहिली अभिनेत्री नाही जिला बॉडी शेमिंगवरनं ट्रोल(Trolled) केलं गेलंय. इथे गरोदर अभिनेत्रींना देखील बॉडी शेमिंग वरनं हिणवलं गेलं आहे. कृतिनं बॉडी शेमिंगच्या ट्रोलिंगवर पलटवार करताना म्हटलं आहे,''मला जे जन्मतः मिळालं आहे त्याबाबतीत मी काहीच करू शकत नाही. खूप छोट्या-छोट्या गोष्टी असतात ज्या स्पष्ट बोलल्या जाऊ शकत नाहीत. मला असं वाटतं की या अशा ट्रोलिंगला अनेकांना सामोरं जावं लागतं. कोणीतरी मला सांगितलं होतं की,आता या बॉडी शेमिंग सारख्या गोष्टींचं दडपण राहिलं नाही.पण मला वाटतं की इन्स्टाग्राम फिल्टरमुळे हे दडपण कमी नाही तर अधिक वाढलं आहे. प्रत्येकाला परफेक्ट नसताना देखील परफेक्ट दिसायचं असतं. मेहनत नको हवी असते''.

कृति सननच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर तिनं आठ वर्षांपूर्वी सिनेइंडस्ट्रीत एन्ट्री केली. आज ती बॉलीवूडचं चर्चेतलं नाव आहे. तिच्या आगामी सिनेमांविषयी बोलायचं झालं तर 'आदिपुरुष','गणपत','शहजादा','भेड़िया' असे सिनेमे रांगेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT