मनोरंजन

Kushal Badrike: तू दूर का, मी असा मजबूर का? बायको परदेशी गेल्याने कुशलने आठवणीत केली ही खास गोष्ट

कुशल सध्या बायकोच्या आठवणीत भावुक झालाय

Devendra Jadhav

Kushal Badrike News: अभिनेता कुशल बद्रिके हा मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतला अभिनेता. कुशलने आजवर त्याच्या अभिनयाने आपल्या सर्वांचं मनोरंजन केलं.

कुशलने गेली अनेक वर्ष चला हवा येऊ द्या च्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवलं. कुशल वेगवेगळी पात्र करून सर्वांना त्याच्या अभिनयाच्या प्रेमात पाडतो. हाच कुशल सध्या बायकोच्या आठवणीत भावुक झालाय.

(kushal badrike emotional post about his wife chala hava yeu dya)

कुशलने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केलीय. मैं हर “वक़्त” बस तुम्हें देखना चाहता हूँ . असं कॅप्शन लिहून त्याने एक फोटो पोस्ट केलाय.या फोटीत कुशलच्या हातात डिजिटल घड्याळ असून त्यावर बायकोचा फोटो दिसतोय.

कुशल बायकीच्या आठवणीत इतका रोमँटिक झालाय की त्याने चक्क बायकोचा फोटो घडाळ्याच्या वॉलपेपरवर लावला आहे.

कुशलचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. अभिनेत्री अभिज्ञा भावेने यावर कमेंट करून अग्गबाई अशी कमेंट केलीय.

याशिवाय एका युजरने दादा वहिनी की जोडी अशी कमेंट केलीय. दुसरा म्हणतो, चल खोटं बोलतोस तू.. फक्त फोटो काढण्यासाठी बायकोचा फोटो ठेवला आहेस.

एका युजरने लिहिलंय की.. तुम्ही जेव्हा वेळ बघणार तेव्हा फोटो उलटा दिसणार. अशा कमेंट करत कुशलच्या फॅन्सनी त्याच्या या खास कृतीचं कौतुक केलंय. तसेच काहींनी मिश्किल शब्दात टिप्पणी केलीय.

कुठे गेलीय कुशलची बायको सुनैना?

कुशलची बायको कुठे गेलीय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो. कुशलची बायको सुनैना अमेरिका दौऱ्यावर गेलीय.

सुनैना मुघल ए आझम या सध्या गाजत असलेल्या नाटकात अभिनय करतेय. सुनैना एक उत्कृष्ट डान्सर आहे. ती मुघल ए आझम नाटकात तिच्या नृत्याचा अविष्कार दिसतोय.

कुशल सुद्धा बायकोच्या पॅशनला सपोर्ट करत असतो. आता बायको अमेरिका दौरा केल्यावर पुन्हा भारतात कधी येईल, याची कुशल वाट बघतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT