Lagira Zala Ji actor Dnyanesh Mane passed away  
मनोरंजन

'लागीरं झालं जी' मालिकेतील अभिनेत्याचं कार अपघातात निधन

रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

स्वाती वेमूल

'लागीरं झालं जी' (Lagira Zala Ji) या मालिकेतील अभिनेते ज्ञानेश माने (Dnyanesh Mane) यांचं अपघाती निधन झालं. ज्ञानेश हे रोटी घाटातून प्रवास करताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर त्यांना पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान १४ जानेवारी रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने कलाविश्वात दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ज्ञानेश हे पेशाने डॉक्टर होते. अभिनयाची आवड असल्याने ते मालिकेत काम करत होते. ते बारामतीतील झारगडवाडी इथले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, भावजया असा परिवार आहे. (Lagira Zala Ji Actor Dnyanesh Mane Passed Away)

'लागीरं झालं जी' या मालिकेत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. याशिवाय त्यांनी सोलापूर गँगवॉर, काळुबाईच्या नावानं चांगभलं, अंबुज, हंबर्डा, पळशीची पीटी यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. 'लागीरं झालं जी' या मालिकेत त्यांनी नितीश चव्हाणसोबत सैन्य अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. ज्ञानेश यांचा नितीशसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनय क्षेत्रात कारकिर्द गाजवत असतानाच त्यांनी डॉक्टरकीची सेवादेखील केली. सोलापूर गँगवॉर या चित्रपटात काम करत असताना त्यांच्या आईच्या निधनाची बातमी त्यांना समजली. त्याच दिवशी गावी जाऊन आईला अखेरचा निरोप देऊन ते पुन्हा शूटिंगसाठी हजर झाले होते. कामाप्रती असलेली त्यांची निष्ठा पाहून सेटवरील कलाकारसुद्धा अचंबित झाले होते. ज्ञानेश यांच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वातून हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT