Lalbaughcha Raja 2023 Ganesh Festival Sunny Leonie esakal
मनोरंजन

Lalbaughcha Raja 2023 : सनी लियोनीनं घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन

लालबागच्या राजाची गोष्टच वेगळी आहे. बॉलीवूड सेलिब्रेटी आणि लालबागचा राजा यांचे कनेक्शन फार जूने आहे.

युगंधर ताजणे

Lalbaughcha Raja 2023 Ganesh Festival Sunny Leonie : लालबागच्या राजाची गोष्टच वेगळी आहे. दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनाला लाखो भाविक गर्दी करत असतात यावेळी बॉलीवूडचे सेलिब्रेटी देखील मोठया प्रमाणात यावेळी दर्शनासाठी येत असतात. यंदाही बॉलीवूडमधील कलाकारांनी लालबागच्या दर्शनाला हजेरी लावली आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

बॉलीवूडचा किंग खान शाहरुखनं त्याचा मुलगा अबराम याला घेऊन लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी त्याची मॅनेजर पूजा ददलानी देखील सोबत होती. त्यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं देखील सहकुटूंब सहपरिवार दर्शन घेतले होते. याशिवाय अभिनेता कार्तिक आर्यन, वरुण धवन यांचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच प्रसिद्ध अभिनेत्री सनी लियोनी लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेली आहे.

Also Read - Libya Flood : मृतदेहांचा रस्त्यावर खच,मदतीची केविलवाणी प्रतीक्षा, युद्धाच्या आगीतून बाहेर

सनी तिच्या कुटूंबासमवेत लालबागच्या राजाला आली होती. त्याचे फोटो सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. बॉलीवूडच्या सेलिब्रेटींसाठी लालबागचा राजा हा नेहमीच आकर्षणाचा विषय राहिला आहे. इतर गणपती मंडळाच्या तुलनेत लालबागच्या राजाला सेलिब्रेटींची असणारी गर्दी खूप काही सांगून जाणारी आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यापासून नव्या पिढीतल्या विकी कौशल पर्यत अनेक सेलिब्रेटी बाप्पाच्या दर्शनाला येत असतात.

सालाबादप्रमाणे याही वर्षी लालबागच्या राजाच्या सजावटीनं भक्तांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी लालबागच्या राजाच्या मंडळाची देखणी सजावट केली आहे. येत्या दिवसांत बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी बाप्पाच्या दर्शनाला येणार आहेत. त्यामध्ये मनोरंजन, समाजकारण, राजकारण या क्षेत्रातील विविध मान्यवर हजेरी लावणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP removes spokesperson Vijeta Dahiya : कॉकरोच जनता पार्टीत फूट? प्रवक्ता विजेता दहियांचे संस्थापक अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप, 'मलाच बळीचा बकरा बनवलं'

Kidney Donation Case : बॉसला किडनी दिली तरीही कंपनीने नोकरीवरुन काढले, महिलेला माणुसकी जपणे पडले महागात; नेमकं काय घडलं?

Latest Marathi Update : उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा! शिवाजी पार्कवरून मोर्चा काढणार

रवी शास्त्रींनी निवडला भारत-इंग्लंडचा All Time XI संघ; धोनी कर्णधार, तर गांगुलीला मात्र...

Anganwadi Nutrition: अंगणवाडीत नोव्हेंबरपासून मिळणार ‘व्हेज पुलाव’; कुपोषणाविरुद्ध पाऊल, पोषण आहार झाला अधिक रुचकर

SCROLL FOR NEXT