Salman Khan  
मनोरंजन

Salman Khan : लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानची सुपारी आता अनमोल बिश्नोईला दिली?

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली : लॉरेन्स बिश्नोईने आता बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या हत्येची सुपारी अनमोल बिश्नोईकडे सोपवल्याचे दिल्ली पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. याबाबत सूत्रांच्या हवाल्याने माहिती देण्यात आली.

सलमान खानला मारण्यात लॉरेन्स टोळी तीन वेळा अपयशी ठरली. तिन्ही वेळा लॉरेन्सचे खास असलेले गँगस्टर संपत नेहरा, दीपक टिनू प्रमुख होते. या दोघांना अपयश आल्यामुळे आता लॉरेन्सने सलमान खानला मारण्याची सुपारी सख्खा भाऊ अनमोलला दिली आहे.

लॉरेन्स गँग आता टर्की मेड जिगाना पिस्टलऐवजी जर्मन मेड पीएस ३० पिस्टलचा वापर करते. हे पिस्टल वर्ल्ड क्लास असून ते ८ ते १० लाख रुपयांना मिळतं. हे पिस्टल दोन्ही हाताने चालवता येतं. लॉरेन्स बिश्नोई गँग या पिस्टलची डिलीवरी परदेशातून मिळवते. हत्यारांची खरेदी अमेरिकेत असलेला कुविख्यात गँगस्टर आणि आंतरराष्ट्री हत्यार तस्कर रणजीत डुपलाकडून होते.

परदेशी हत्यार तस्करी प्रकरणी फरीदकोट जिल्हा न्यायालयाने डुपला याला डिसेंबर २०१७ मध्येच फरारी घोषित केलं होतं. त्याच्यावर अनेक राज्यात अपहरण, हत्येचा प्रयत्न, दरोडे आणि कॉन्ट्रॅक्ट किलींगचे गुन्हे दाखल आहेत.

त्याला २०१४ मध्ये अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून परदेशी हत्यार हस्तगत करण्यात आले होते. हे हत्यार श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांसह पंजाबमधील गँगस्टर्सला विकले जायचे.

लॉरेन्स टोळी आता दक्षिण भारतात आपली टोळी मजबूत करण्यात गुंतली आहे, त्यांनी संपत नेहराला दक्षिण भारतात टोळी तयार करण्याचे काम दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT