Imlie Serial Esakal
मनोरंजन

Imlie Serial: प्रसिद्ध मालिकेच्या सेटवर विजेचा धक्का लागल्याने लाईटमनचा मृत्यू

Vaishali Patil

Lightman dies on the sets of Imlie: स्टार्स प्लसवरील 'इमली' हा शो प्रेक्षकांच्या मोठ्या पंसतीचा आहे. मात्र या सेटवरुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गोरेगाव फिल्मसिटीतील घटना इमलीच्या सेटवर मोठी दुर्घटना घडली आहे.

या मालिकेच्या सेटवर विजेचा धक्का लागल्याने लाईटमनचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘इमली’ या मालिकेच्या सेटवर काम करत असताना अचानक विजेचा धक्का लागल्याने ही दुर्घटना घडली आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव महेंद्र यादव असं आहे.

मुंबईतील गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये फिल्मसिटीमध्ये 'इमली' मालिकेचे शूटिंग सुरू होतं. यावेळीच लाईटमन महेंद्रला विजेचा तीव्र धक्का लागला. विजेचा धक्का लागताच त्याला तातडिने रुग्णालयात नेण्यात येत असतांना रुग्णवाहिकेतच महेंद्रचा मृत्यू झाला.

महेंद्र यादव हा 28 वर्षांचा होता. त्याला काही दिवसांपूर्वीदेखील विजेचा धक्का लागल होता मात्र त्यानंतर पुन्हा त्याला 19 सप्टेंबरला विजेचा धक्का लागला आणि महेंद्रला जीव गमवावा लागला.

महेंद्रने यापुर्वीही अनेक मालिकांसाठी लाईटमनचे काम केले होते. लाईटमनच्या मृत्यूनं सेटवरील सर्वांना याने धक्का बसला आहे. त्याला विजेचा धक्का कुठे आणि कसा लागला याबबात काही माहीती समोर आलेली नाही. मात्र या घटनेनंतर 'इमली' मालिकेचे शूटिंग थांबविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Protest : सरकारकडून चर्चेची तयारी, तर दुसरीकडे मेट्रोची १५ स्टेशन्स बंद; राजधानीत काय घडतंय?

Sadabhau Khot Education : 'नीट विरोधात आंदोलन करणारे विद्यार्थी आतंकवादी'; असे म्हणणाऱ्या सदाभाऊ खोतांचे शिक्षण झाले तर किती?

Live Updates Marathi : पाटणात कॉंग्रेस कार्यालयाबाहेर भाजपचे आंदोलन, कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप

४८ तास धोक्याचे! राज्यात पावसाचा जोर कायम राहणार; घाटमाथ्यावर 'रेड अलर्ट', मुंबईसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशी IN, रिंकू सिंगचे पुनरागमन, एकाचे पदार्पण! पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची Playing XI

SCROLL FOR NEXT