Madhuri Dixit Instagram
मनोरंजन

'धकधक गर्ल' माधुरीला तिच्या 'त्या' चुकीसाठी आई आजही ओरडते

'द फेम गेम' या वेबसिरीजच्या माध्यमातून अभिनेत्री डिजिटल माध्यमात पदार्पण करीत आहे.

प्रणाली मोरे

माधुरी दिक्षितने(Madhuri Dixit) ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले आहे. माधुरीची 'द फेम गेम' वेबसिरीज नेटफ्लिक्स वर प्रदर्शित झाली आहे. बॉलीवूडमध्ये आपल्या सिनेमांच्या माध्यमातून सुपरस्टार पदापर्यंत झेप घेणारी माधुरी आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही आपल्या अभिनयातनं लोकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. या सीरीजमध्ये ग्लॅमर वर्ल्डची डार्क साइड दाखवण्यात आली आहे. या सीरीजमधील माधुरीच्या अभिनयाला चांगली पसंती मिळाली आहे. पण आपल्याला माहितीय का तिच्या खऱ्या आयुष्यात तिला 'फेम गेम' चा कधी सामना करावा लागला होता?

माधुरीनं या वेबसिरीजच्या निमित्तानं दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की,प्रत्यक्ष तिला सिनेकरिअरमध्ये ग्लॅमरच्या त्या कटू सत्याचा कधीच सामना करावा लागला नाही. स्वतःच्या वैयक्तिक आणि व्यावासायिक आयुष्याला नेहमी वेगळं ठेवल्या कारणानं आपण यातनं बचावलो असं ती म्हणाली. तिनं पुढे म्हटलं की,''मी अशा वातावरणात मोठी झालेय जिथे माझ्याभोवतीच्या ग्लॅमरच्या,स्टारपदाच्या वलयानं मला कधीच अंहकाराच्या किंवा चुकीच्या मार्गावर नेलं नाही. मी खूप प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्री झाल्यानंतर देखील माझी आई स्नेहलता दिक्षित हिचं माझ्याशी वागणं कधीच बदललं नाही''.

माधुरी आपल्या मुलाखतीत पुढे म्हणाली,''जेव्हा मी सिनेमे करत होती तेव्हाची ही गोष्ट. तेव्हा मी जर माझी खोली स्वच्छ ठेवली नाही तर माझी आई मला खूप ओरडायची. त्याच वातावरणात मी मोठी झाले आणि मी आजही तशीच आहे,आईचा ओरडा मला आजही मिळतो. जेव्हा मी घरी जाते तेव्हा मी घरची होते आणि जेव्हा मी कामावर,शूटिंगवर असते तेव्हा मी तिथली बनून जाते. मी कधीच कामात सरमिसळ केली नाही. त्यामुळे मला प्रत्येक गोष्टीचा आनंद नीट घ्यायला मिळतो. कारण जेव्हा मी कॅमेऱ्यासमोर असते तेव्हा मी पूर्णतः त्या भूमिकेची होऊन जाते आणि जेव्हा मी भूमिकेतनं बाहेर येते तेव्हा मी पुन्हा फक्त माधुरी दिक्षित,म्हणजे माझ्या आईची मुलगी,माझ्या नवऱ्याची बायको तसंच माझ्या मुलांची आई बनून जाते. कारण तसेच संस्कार देऊन माझ्या आईनं मला मोठं केलं आहेत''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Corporation protest : महापालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले; महापौरांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न, एक कर्मचारी जखमी

Pune Railway: पुणेकर रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! १९ सप्टेंबरपासून १५ दिवस रेल्वेचा मेगा ब्लॉक; ४२ गाड्या रद्द, २५ गाड्यांचे मार्ग बदलले

जरांगेंची प्रकृती खालावली, वजन ७ किलोंनी घटलं तर शुगरही कमी झाली; मंत्र्यांच्या आश्वासनानंतर घेतले उपचार

Marathi News Live Updates : जरांगेंचा अल्टिमेटम, मुंबईत हालचालींना वेग; मध्यरात्री मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

Mumbai Goa Highway: उड्डाणपूल रखडला, कोंडी कायम; चिपळूणमधील सेवारस्त्यांवर गणेशोत्सवात वाहतुकीचा ताण

SCROLL FOR NEXT