Mahaparinirvan Diwas 2023 Esakal
मनोरंजन

Mahaparinirvan Diwas 2023: शोषितांच्या अनेक पिढ्यांचा उद्धार करणारा हा खरा योद्धा ! मानेंची पोस्ट व्हायरल

आज सामाजिक, राजकीय, सांस्कृतिकपासून ते सिनेसृष्टीतूनही बाबासाहेबांना अभिवादन केलं जातंय.

Vaishali Patil

आज 6 डिसेंबर असून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन आहे. देशभरात आजच्या दिवस हा महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो. बाबासाहेबांचे निधन 6 डिसेंबर 1956 रोजी झाले.

भारताचे पहिले कायदामंत्री आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Din) आज सामाजिक, राजकीय, सांस्कृतिकपासून ते सिनेसृष्टीतूनही बाबासाहेबांना अभिवादन केलं जातंय.

आजच्या महापरिनिर्वाण दिनी अभिनेता किरण माने यांनीही एक पोस्ट शेयर करत आंबेडकरांना आपल्या खास लेखन शैलीत अभिवादन केलंय.

बाबासाहेबांना अभिवादन करताना त्यांचा एक फोटो शेअर करत किरण माने लिहितात,

'याच्यापेक्षा देखणा 'हिरो' मी आयुष्यात पाहिलेला नाही भावांनो... नादखुळा ॲटिट्युड.

हजारो वर्ष चालत आलेल्या वर्चस्ववादावर लाथ घालून शोषितांच्या अनेक पिढ्यांचा उद्धार करणारा हा खरा योद्धा !

जात, धर्म, वंश, पंथ, रूढी, परंपरा, रंग, भाषा, वेश, अन्न, इतिहास, भुगोल, हवामान, तापमान सगळ्या-सगळ्या बाबतीत प्रचंड वैविध्य असलेल्या या विशाल भूभागाला एक अखंड 'देश' म्हणून एकत्र बांधणारा... प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य-समता-बंधुता-न्याय ही मुल्यं देऊन स्वत:चा विकास करण्याचा अधिकार देणारं संविधान लिहीणारा खराखुरा महानायक !

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर... विनम्र अभिवादन.

जय भीम.'

अशा शब्दात किरण माने यांनी बाबासाहेबांना मानवंदना दिलीय. सध्या त्यांची पोस्ट व्हायरल होत आहे. नेटकरी त्यांच्या पोस्टवर कमेंट करत बाबासाहेबांना अभिवादन करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: शिंदेंच्या दरे गावात फडणवीस उभारणार तणाव मुक्तीकेंद्र, बजेटमध्ये केली घोषणा; काय म्हणाले?

Free Health Services : मोफत उपचारांसाठी नागरिकांची गर्दी; कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य केंद्रांवर रुग्णांचा वाढता विश्वास

Kolhapur Black Spots : निम्मे शहर, ‘ब्लॅक स्पॉट’चा कहर; वाहनधारकांच्या जीवाशी खेळ, किरकोळ उपाय; जीव गेल्यानंतरच हालचाली

Viral Video : मॅडमचा शाळेत राजेशाही थाट ! शिकवायचं सोडून विद्यार्थिनींकडून वर्गातच करुन घेतला मसाज, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Farmer Loan: अटी-शर्तींमुळे लाखो शेतकरी कर्जमाफी योजनेतून बाहेर राहणार; राजू शेट्टींनी उपस्थित केला कळीचा मुद्दा

SCROLL FOR NEXT