Dattu More esakal
मनोरंजन

Dattu More: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम दत्तू झाला घरंदाज! म्हाडाच्या लॉटरीत मिळाले घर

Dattu More: छोट्याशी चाळीत राहणाऱ्या दत्तूला म्हाडाच्या कोकण मंडळाने काढलेल्या लाॅटरीत एक नव्हे तर चक्क दोन घरे लागली आहेत.

priyanka kulkarni

Maharashtrachi Hasyajatra: छोट्या पडद्यावरील महाराष्ट्राची हस्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या मराठमोळ्या शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला 'दत्तू' म्हणजेच अभिनेता दत्तू मोरे (Dattu More) लवकरच आपल्या हक्काच्या घरात जाणार आहे. सध्या ठाण्यातील छोट्याशी चाळीत राहणाऱ्या दत्तूला म्हाडाच्या कोकण मंडळाने काढलेल्या लाॅटरीत एक नव्हे तर चक्क दोन घरे लागली आहेत. त्यामुळे दत्तू ख-या अर्थाने घरंदाज झाला असून लवकरच चाळीतून अलिशान फ्लॅटमध्ये त्याचे मार्गक्रमण होणार आहे.

सर्वसामान्यांना हक्काचे घर देण्यासाठी म्हाडाच्या कोकण मंडळाने नुकतीच पाच हजारहून अधिक घरांसाठी लॉटरी काढली होती. त्यासाठी जवळपास 25 हजार अर्ज आले होते. मूळचा ठाण्याचा असलेला अभिनेता दत्तू मोरे वागळे इस्टेट येथील रामनगर भागातल्या चाळीत वास्तव्याला आहे. त्याचे बालपणही याच चाळीत गेले आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाने घरांसाठी काढलेल्या लॉटरीत आपले नशीब आजमावण्यासाठी ठाण्यातील दोन ठिकाणी अर्ज भरले होते. पहिल्यादाच म्हाडाच्या घरासाठी अर्ज भरलेल्या दत्तूला नशीबानेही चांगला साठ दिली असून त्याला ठाण्याच्या रौनक ब्लिझ आणि हायलॅंड स्प्रिग या दोन गृह प्रकल्पात घरे लागली आहेत.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून दत्तू घराघरात पोहोचलेल्या दत्तूचा गौरव म्हणून तो ज्या चाळीत वास्तव्याला आहे त्या चाळीला चाळक-यांनी या चाळीला प्रेमाने 'दत्तू चाळ' असे नाव दिले.

चाळीबाबत अत्मियता आपला आनंद व्यक्त करताना तो म्हणाला, पहिल्याच प्रयत्नात मला म्हाडाचे घर मिळाले याचा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही. चाळीत राहताना इतरांप्रमाणे मी देखील उंच टोलेजंग इमारतीत फ्लॅट खरेदी करण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र त्यावर काहीशा मर्यादा येत होत्या. पण आता माझे हे स्वप्न आता पूर्ण होत आहे. माझे बालपण चाळीत गेल्यामुळे फ्लॅट संस्कृतीत मी कितपत रमेन, हे मला माहित नाही. तरीही मी नव्या घरात राहायला गेलो तरी चाळीबाबत माझ्या मनात कायमच अत्मियता राहिल अशी भावना दत्तू मोरे याने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT