Jay Dudhane  
मनोरंजन

महेश मांजरेकरांची मोठी घोषणा; जय दुधाणेला घेऊन करणार चित्रपट

चित्रपटाचं नाव असेल 'शनिवारवाडा'

स्वाती वेमूल

बिग बॉस मराठी ३च्या ग्रँड फिनालेमध्ये सूत्रसंचालक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी मोठी घोषणा केली आहे. जय दुधाणेला (Jay Dudhane) घेऊन चित्रपट करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. या चित्रपटाचं नाव 'शनिवारवाडा' (Shaniwarwada) असेल असं त्यांनी सांगितलं. मांजरेकरांच्या या घोषणेमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. 'शनिवारवाडा' या चित्रपटात जयसोबत इतक कोणते कलाकार झळकणार याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

बिग बॉसच्या घरात जयने त्याच्या आक्रमन शैलीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्याचा घरातील संपूर्ण प्रवास आणि घरात येण्यापूर्वीचाही प्रवास रंजक आहे. जय हा रोडीज या प्रसिद्ध रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाला होता.

जय दुधाणेने बिग बॉस तेलुगूच्या तिसऱ्या सिझनमध्येही भाग घेतला होता. तर स्प्लिट्सविला या शोचं विजेतेपद त्याने पटकावलं आहे. बिग बॉस मराठी ३च्या घरातील सर्वांत दमदार स्पर्धकांपैकी एक जय आहे. मात्र अनेकदा तो त्याच्या स्वभावामुळे आणि वागण्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल होतो. आपल्या तापट स्वभावामुळे बिग बॉसच्या घरात अनेकांशी तो वाद ओढवून घेतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo Srinagar Airport Accident : मोठी दुर्घटना टळली! श्रीनगर विमानतळावर इंडिगोचे विमान रनवेवरील खांबाला धडकले अन्...

Kolhapur Threat Case: ‘कारागृहातून बाहेर आल्यावर तुझ्या नवऱ्याला सोडणार नाही’ महिलेला धमकी; रविकिरण इंगवलेविरोधात गुन्हा

ना ऑडिशन, ना मोठी टीम! ‘हनुमान अंश’ची शूटिंग अशी व्हायची! गावोगावी फिरून माईकवर केली जायची घोषणा!

Marathi News Live Updates : लिहाखेडी फाट्यावर सकल मराठा समाजाचा रास्ता रोको; महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प

Nardave Irrigation Project Update : 20 वर्षांपासून रखडलेल्या नरडवे धरणाचा मार्ग मोकळा; 'या' गावांतील 152 कुटुंबांना मोठा दिलासा, मदत अन् पुनर्वसन विभागाकडून GR जारी

SCROLL FOR NEXT