Malaika Arora,Eknath Shinde 
मनोरंजन

Malaika Arora: मलायकाची संतप्त पोस्ट; मुख्यमंत्री शिंदेंना टॅग करत म्हणाली...

Malaika Arora: अभिनेत्री मलायका अरोरानं (Malaika Arora) सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांना टॅग केलं आहे.

priyanka kulkarni

Malaika Arora: सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडीओ व्हायरल होत. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती श्वानाला मुक्का मारताना आणि लाथ मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ ठाण्यातील एका पाळीव प्राण्यांच्या दवाखान्यातील आहे, असं म्हटलं जात आहे. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अशातच आता या संपूर्ण प्रकरणावर अनेक सेलिब्रिटी संताप व्यक्त करत आहेत. अभिनेत्री मलायका अरोरानं (Malaika Arora) देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांना टॅग केलं आहे.

मलायकाची पोस्ट

मलायकानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती श्वानाला मारताना दिसत आहे. तर पोलीस एका व्यक्तीला ताब्यात घेत आहे, असंही दिसत आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये मलायकानं लिहिलं,"मला आशा आहे की, तो गरीब असहाय कुत्रा ठीक असेल. मला खूप राग आला आहे, मला विश्वास आहे की, या प्रकरणाची कारवाई करण्यात आली असेल. त्या व्यक्तीला कठोर शिक्षा करण्याची वेळ आली आहे." या पोस्टमध्ये मलायकानं एकनाथ शिंदे यांना टॅग केलं आहे.

रितेश देशमुखनं देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या प्रकरणावर भाष्य केलं आहे. "या व्यक्तीला अटक करा आणि तुरुंगात टाका", अशी पोस्ट रितेशनं शेअर केली.

जेव्हा ठाण्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा PAWS चे पदाधिकारी, नीलेश भांगे आणि इतर काही जणांनी तक्रार दाखल केली, असे एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकारमध्ये लवकरच मोठा फेरबदल, धर्मेंद्र प्रधान यांची पुन्हा मंत्रिमंडळात एंट्री? कोणत्या मंत्र्याला मिळणार डच्चू?

IND vs SL 1st Test: Manav Suthar च्या १० विकेट्स अन् भारताचा दणदणीत विजय; मालिकेत १-० अशी आघाडी, WTC Final च्या आशा कायम

Raju Navghare: आमदार राजू नवघरे नाशिक-अहिल्यानगर दौऱ्यावर; विकासकामे आणि नागरिकांच्या प्रश्नांचा घेणार आढावा

Phulambri Medical Waste: सार्वजनिक ठिकाणी सिरिंज, इंजेक्शनच्या बाटल्या; फुलंब्रीतील शिवमनगरी परिसरातील नागरिकांच्या जिवाशी खेळ

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा सुनेत्रा पवारांसह उद्धव ठाकरेंना धक्का; राष्ट्रवादी नगरसेवकांसह ठाकरे गटाचे पदाधिकारी शिवसेनेत

SCROLL FOR NEXT