Kalabhavan Haneef Died Esakal
मनोरंजन

Kalabhavan Haneef Died: प्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या 63 व्या वर्षी निधन!

Vaishali Patil

Kalabhavan Haneef Died: मल्याळम मनोरंजन विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता आणि मिमिक्री आर्टिस्ट कलाभवन हनिफ यांचे निधन झाले आहे. ते 63 वर्षांचे होते. त्यांनी गुरुवारी कोची येथे अखेरचा श्वास घेतला. कलाभवन हे गेल्या काही दिवसांपासून श्वसनाच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते.

कलाभवन यांनी 1991 मध्ये 'चेप्पुकिलकन्ना चनागाथी' या चित्रपटाद्वारे आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. कलाभवन यांनी 150 हून अधिक मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी रंगभूमीवरही अनेक नाटके केली.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, कलाभवन हनिफ यांच्यावर एर्नाकुलम येथील एका खाजगी रुग्णालयात श्वसनाच्या आजारावर उपचार सुरू होते. कलाभवन हनिफ यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

कलाभवन यांच्या निधनाने दक्षिण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांचे चाहते आणि जवळचे मित्र, कुटुंबीय त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत आहेत.

हनिफ हे कोचीजवळील मट्टनचेरी येथील रहिवासी होते. आपल्या मिमिक्री परफॉर्मन्सद्वारे त्यांनी टिन्सेल शहरात प्रवेश केला होता. यावर्षी ऑस्करसाठी पोहोचलेल्या '2018' आणि 'दृश्यम' या चित्रपटांमध्येही हनीफ यांनी काम केले होते. 2001 च्या स्लॅपस्टिक कॉमेडी 'परक्कम थालिका' द्वारे त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांच्यावर शुक्रवारी मट्टनचेरी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

दिलीप, अँटोनी वर्गीस आणि मंजू वॉरियर यांसारख्या अभिनेत्यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला असून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Kishor: 'सम्राट चौधरींना गोळी मारा...' प्रशांत किशोर यांनी खरेच असे विधान केले आहे का?

Numerology: 'तीन तिघाड काम बिघाड' असं का म्हटलं जातं; ३ अंक खरोखरच अशुभ असतो का? पाहा काय सांगते अंकशास्त्र...

Latest Marathi News Live Update : शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत; एकनाथ शिंदेंची घोषणा

Train Ticket Booking: तत्काळमध्येही तिकीट मिळत नाही? रेल्वेची ही ट्रिक वापरा, मिळू शकतं कन्फर्म तिकीट!

भारतात सोशल मीडियावर चाईल्ड मोड येणार? सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण शिफारस; ''इंटरनेट हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार..''

SCROLL FOR NEXT