Manoj Bajpayee Bollywood Actor Share Six pack abs esakal
मनोरंजन

Manoj Bajpayee : आईशपथ...! हा खरचं मनोज वाजपेयी आहे? 'फॅमिली मॅन' नं पहिल्यांदाच दाखवले 'सिक्स पॅक अ‍ॅब्ज'

'Family Man' Shows 'Six Pack Abs' For The First Time: बॉलीवूडमध्ये सर्वोत्तम अभिनेत्यांमध्ये पहिल्या पाच अभिनेत्यांमध्ये मनोजचे नाव आवर्जुन घ्यावे लागेल.

युगंधर ताजणे

Manoj Bajpayee Bollywood Actor Share Six pack abs :

सत्या असो किंवा गँग्स ऑफ वासेपूर नाही तर अलीकडे आलेला जोराम, विषय कोणताही असला तरी त्याच्या अभिनयाचं कौतुक झाल्याशिवाय राहत नाही. पाठीशी कुणी नसताना केवळ स्वताच्या अभियनाच्या जोरावर मनोजनं त्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

बॉलीवूडमध्ये सर्वोत्तम अभिनेत्यांमध्ये पहिल्या पाच अभिनेत्यांमध्ये मनोजचे नाव आवर्जुन घ्यावे लागेल. प्रचंड संघर्ष, कष्ट यांच्या जोरावर मनोजनं त्याची वेगळी वाट तयार केली आहे. आपली दखल घेण्यास प्रेक्षकांना आणि चाहत्यांना भाग पाडले आहे. समोर जे दिसते त्यावर आपल्याला काय वाटते हे परखडपणे सांगताना मनोज जराही डगमगत नाही.

प्रस्थापित आणि बाहेरुन नव्यानं आलेले कलाकार यांच्याविषयी तो तितक्याच पोटतिडकीनं बोलतो. कठीण काळात आपल्याला ज्या मित्रांनी मदत केली त्यांच्याप्रती तो नम्र आहे. त्यांच्या मदतीची त्याला जाणीव आहे. म्हणून कितीतरी मुलाखतीमध्ये मनोज बिनधास्तपणे त्यांची नाव घेत ज्याचे श्रेय त्याला द्यायला हवे हेही मोकळेपणानं सांगतो.

नवीन वर्षाच्या निमित्तानं मनोजनं जे फोटो इंस्टावर शेयर केले आहे त्याची चर्चा होत आहे. तो फोटो पाहून प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता अनुराग कश्यपनं दिलेली कमेंट तर भन्नाट आहे. तू तर छुपा रुस्तूम आहेस. असं त्यानं म्हटलं आहे. मनोजच्या कित्येक स्टार सहकाऱ्यांनी त्याचे कौतुक केले आहे. असं काय झालं की त्याच्यावर एवढा कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे?

खरं तर यापूर्वी आपण बॉलीवूडमधील सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान, यांना सिक्स अॅब्ज दाखवतानाचे फोटो पाहिले आहे. यात आता कित्येक नवोदित अभिनेत्यांची देखील भर पडलेली आहे. यावेळी मात्र मनोजनं नव्या वर्षाच्या निमित्तानं शेयर केलेला तो फोटो चाहत्यांच्या कौतुकाचा विषय आहे.

मनोजनं सिक्स पॅक अॅब्जचा फोटो त्याच्या इंस्टावरुन शेयर केला असून त्याला दिलेली कमेंटही चर्चेत आली आहे. त्या फोटोवर कॅप्शन देताना तो म्हणतो... हे पाहा, नव्या वर्षातील माझं वेगळं रुप....मी घेत असलेल्या डेलिशियस सूपचा हा परिणाम आहे. आहे की नाही माझा किलर लूक? असा सवालही त्यानं चाहत्यांना, नेटकऱ्यांना विचारला आहे. त्यावर त्याल आलेल्या प्रतिक्रियाही कमालीच्या भन्नाट आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT