Maratha Reservation Manoj Jarange Jalna protest marathi movie producer Govardhan Doltade  SAKAL
मनोरंजन

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाचा लढा पडद्यावर झळकणार; लढवय्ये मनोज जरांगेंच्या जीवनावर येणार चित्रपट

मनोज जरांगे पाटलांच्या आयुष्यावर सिनेमा येणार असल्याची चर्चा आहे

Devendra Jadhav

Manoj Jarange Patil News: मराठा आंदोलनाने चांगलाच जोर धरला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे गेले काही दिवस उपोषणाला बसले आहेत.

शांततेच्या मार्गाने मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सुरु होते मात्र या आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यामुळे संपूर्ण राज्याचे राजकारण ढवळून निघालं आहे. आता संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर सिनेमा येतोय.

(Maratha Reservation Manoj Jarange Jalna protest marathi movie producer Govardhan Doltade)

मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर सिनेमा

सामच्या वृत्तानुसार, मनोज जरांगे यांच्या जीवनावर चित्रपट बनवला जाणार आहे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या नावाने चित्रपट बनवणार असल्याची शक्यता आहे.

याशिवाय सिनेमाचं प्राथमिक नाव 'खळग' असल्याची माहिती मिळतेय. या सिनेमाच्या मेकिंगसाठी खळग चित्रपटाची टीम जरांगे यांच्या भेटीला गेली असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात स्वतः मनोज जरांगे पाटील हे सुद्धा भूमिका सााकारणार असल्याचं बोललं जातंय.

हा अभिनेता साकारणार मनोज जरांगे पाटील यांची भुमिका ?

मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारीत सिनेमाचं दिग्दर्शन शिवाजी दोलताडे करत आहेत. तर डी गोवर्धन दोलताडे सिनेमाचे निर्माते आहेत. अभिनेता रोहन पाटील सिनेमात मनोज जरांगे पाटील यांची भुमिका साकारणार असं समजतंय. या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच डिसेंबर २०२३ पासून सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल.

कोण आहेत, मनोज जरांगे?

मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाकडून जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. मागील अनेक वर्षांपासून मनोज मराठा आंदोलन चळवळीत सक्रिय आहेत. सर्वसामान्य परिस्थिती वाढलेल्या मनोज यांचे शिक्षण १२ पर्यंत झालं आहे. हॉटेलमध्ये काम करत त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली.

मनोज जरांगे हे २०११ पासून मराठा आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी २०१४ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्तालयावर काढलेल्या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधले होते. याशिवाय २०१५ ते २०२३ या आठ वर्षांच्या कालावधीत त्यांनी ३० हून अधिक आंदोलने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: काँग्रेसने विधेयकाची भ्रूणहत्या केली, पापाची शिक्षा नक्की मिळेल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्राला संबोधन

SRH vs CSK Live: संजू सॅमसनचा एक निर्णय अन् गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्याने हैदराबादचे नशीब बदलून टाकले; चेन्नईने कमबॅक केले

SRH vs CSK Live: अभिषेक शर्माला 'चिटींग' करायची होती, पण संजू सॅमसनने चोरी पकडली; IPL 2026 मध्ये आणखी एक ड्रामा, Video

IPL 2026 News: विराट कोहलीच्या stunning catch वर व्हायरल होतेय अनुष्का शर्माची रिअ‍ॅक्शन; Video

Khambatki Ghat Traffic Jam : खंबाटकी घाटात ST बस ठप्प; विकेंडला पुणे-सातारा महामार्गावर भीषण ट्रॅफिक कोंडी!

SCROLL FOR NEXT