Subodh Bhave Fulrani Esakal
मनोरंजन

Subodh Bhave Fulrani: गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर फुलणार 'फुलराणी'

सकाळ डिजिटल टीम

मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेता म्हणजेच सुबोध भावे. सुबोध वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका नेहमी साकारत असतो आणि त्यामुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. नुकताच सुबोध 'हर हर महादेव' या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाजारांच्या भूमिकेत दिसला होता.

आता लवकरच येत्या मार्च 'फुलराणी' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सुबोध भावेच्या 'फुलराणी' या चित्रपटाची प्रेक्षक वाट पाहत होते. अखेर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर फुलराणी चित्रपटगृहात फुलणार आहे.

सुबोध भावेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करत त्याने, ‘हटके तिची स्माईल बिंदास तिची अदा , दुनिया तिच्यावर फिदा! 'फुलराणी फुलणार आपल्या नव्या वर्षात अर्थात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर २२ मार्च २०२३ पासून चित्रपटगृहांत '

फुलराणी या चित्रपटात सुबोध भावे विक्रम राजाध्यक्ष हे पात्र साकारणार आहे. फुलराणी चित्रपटात भूमिका साकारण्याविषयी सुबोध म्हणाला, “प्रत्येक भूमिकेने मला वेगळी ओळख दिली. चौकटी पलीकडच्या भूमिका करायला मी नेहमीच प्राधान्य दिले आहे. ‘फुलराणी’ चित्रपटाची कथा आणि माझ्या भूमिकेची संकल्पना जेव्हा लेखक-दिग्दर्शक विश्वास जोशींनी मला ऐकवली, तेव्हा त्यातल्या वेगळेपणामुळे मी लगेचच त्यांना होकार दिला.”

फुलराणी’ चित्रपटाचे चित्रीकरण कोरोना काळात पूर्ण झाले आहे. ‘पिग्मॅलिअन’ या गाजलेल्या नाट्यकृतीवर, १९६४ साली आलेली ‘माय फेअर लेडी’ ही म्युझिकल फिल्म चांगलीच गाजली होती. याच ‘पिग्मॅलिअन’ कलाकृतीने प्रेरित होऊन ‘फुलराणी…अविस्मरणीय प्रेमकहाणी’ हा चित्रपट मराठी रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. विश्वास जोशी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. हर्षवर्धन साबळे, जाई जोशी, अमृता राव हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Open or Closed Update: अनंत चतुर्थीला महाराष्ट्रात बँका सुरू की बंद? RBI कडून मोठी अपडेट

Nandigram By-Election Symbol Controversy : निवडणूक आयोगाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर; 183 चिन्हं असताना 'लिफाफा' वरच वाद का? हायकोर्टानं कोणाला सुनावलं?

Thane Water Supply: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! २४ तास पाणीकपात, कोणत्या भागांना फटका?

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Rare Otters in Sangli : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! कृष्णा नदीपात्रात पहिल्यांदाच आढळला दुर्मिळ पाणमांजरांचा कळप; 8 ते 9 पाणमांजरं दिसली एकत्र

SCROLL FOR NEXT