Ved Box Office Collection Esakal
मनोरंजन

Ved Movie Record: वेडनं केलं 'सैराट'... पब्लिक नुसतं झिंग झिंग झिंगाट...

Vaishali Patil

 Ved movie Box Office Collection: सध्या मनोरंजन विश्वात चर्चा सुरु आहे ती म्हणजे रितेश देशमुखच्या वेड या चित्रपटाची. मराठी मनोरंजन विश्वात या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे.अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखच्या 'वेड' या सिनेमाने पहिल्या आठवड्यात चांगली कमाई केली.

त्यामुळे आता दुसऱ्या आठवड्यात हा चित्रपट जादू दाखवणारं की नाही याची उत्सुकता होतीचं मात्र आता दुसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरुचं आहे.

आता या चित्रपटानं नागराज मंजुळेंच्या 'सैराट' या सुपरहिट चित्रपटाचाही रेकॉर्ड मोडला आहे. आर्ची आणि परशाची लव्हस्टोरी असलेला 'सैराट' हा मराठी चित्रपटांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होता. या सिनेमानं 12.10 कोटींची कमाई करत रेकॉर्ड केला.

मात्र आता त्या यादीत आपलं नावं लिहिलयं. प्रदर्शनाच्या दुसऱ्या रविवारी वेडने जमावला 5.70 कोटींचा गल्ला, या आकड्यासह सुपरहीट सैराटचा विक्रम मोडला. 'वेड' या सिनेमाने आतापर्यंत 33.42 कोटींची कमाई केली आहे.

आता या चित्रपटानं नागराज मंजुळेंच्या 'सैराट' या सुपरहिट चित्रपटाचाही रेकॉर्ड मोडला आहे. आर्ची आणि परशाची लव्हस्टोरी असलेला 'सैराट' हा मराठी चित्रपटांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होता. या सिनेमानं 12.10 कोटींची कमाई करत रेकॉर्ड केला.

मात्र आता त्या यादीत आपलं नावं लिहिलयं. प्रदर्शनाच्या दुसऱ्या रविवारी वेडने जमावला 5.70 कोटींचा गल्ला, या आकड्यासह सुपरहीट सैराटचा विक्रम मोडला. 'वेड' या सिनेमाने आतापर्यंत 33.42 कोटींची कमाई केली आहे.

अशी केली 'वेड'नं कमाई

'वेड' चित्रपटाने पहिला दिवस - 2.25 कोटी, दुसरा दिवस - 3.25 कोटी, तिसरा दिवस - 4.50 कोटी, चौथा दिवस - 3.02 कोटी, पाचवा दिवस - 2.65 कोटी, सहावा दिवस - 2.55 कोटी, सातवा दिवस - 2.45 कोटी, आठवा दिवस - 2.52 कोटी, नऊवा दिवस - 4.53 कोटी, दहावा दिवस - 5.70 कोटी अशी ताबडतोड कमाई करत रविवारच्या अखेरीस एकूण कमाई - 33.42 कोटींचा गल्ला जमवला आहे. रिलीजच्या दहा दिवसांनंतरही या चित्रपटातची हवा आहे.

हा सिनेमा चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा किती कमाई करणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. 'वेड' या सिनेमात रितेश-जिनिलियासह अशोक सराफ, विद्याधर जोशी, शुभंकर तावडे आणि जिया शंकर हे कलाकारदेखील मुख्य भूमिकेत आहेत. तसेच वेडया सिनेमामध्ये बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खानची झलकदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT