Ved Movie Esakal
मनोरंजन

Ved Movie: "सत्या-श्रावणीच पुढं काय?" चाहते नाराज! रितेश देणार उत्तर...

Vaishali Patil

Ved Marathi Movie: अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलियाच्या वेड या चित्रपटाने प्रेक्षकांना खरचं वेड केलयं. या चित्रपटात आपल्याला प्रेमाची खरी व्याख्या सांगण्याचा प्रयत्न या जोडीनं केला आणि तो चाहत्याच्या काळजाला भिडला.

सत्या आणि श्रावणीच्या प्रेमानं सर्वांनाच भावुक केलं. या चित्रपटाच्या कथेसोबतच प्रेक्षकांना या चित्रपटातील गाण्यांनीही वेड केलं. चित्रपटाची क्रेझ तर तुम्हाला चित्रपटाच्या कमाईवरुन कळलंच असेल.रितेशच्या वेड नं जवळपास ५० कोंटीचा गल्ला कमावला आहे. अजूनही या चित्रपटाची रेकॉर्ड ब्रेक कमाई सुरुचं आहे.

अशातच रितेशने वेडच्या यशानंतर प्रेक्षकांना एक सरप्राईज देण्याचं ठरवलं आहे. प्रेक्षकांना चित्रपट आवडला आणि त्यातल्या गाण्यानेही त्यांना भूरळ घातली मात्र तरीही रितेशचे चाहते त्याच्यावर नाराज आहेत. याची माहिती स्वत: रितेशनेच व्हिडिओ शेअर करत दिली.

रितेशने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात त्याचा चित्रपटातील मित्र शुभंकर तावडे गप्पा मारत असतात. शुभंकर म्हणतो, ' वाह! सिनेमा तर हिट झाला ब्लॉकबस्टर.. पुढे काय झालं?' यावर रितेश म्हणतो, 'कशाचं?' शुभंकर म्हणतो, सत्या' आणि श्रावणीचं पुढे काय झालं?'

रितेश म्हणतो,'काय झालं..हॅपिली एव्हर आफ्टर. यावर शुभंकर सांगतो, 'लोकं पण ना वेडी आहेत. लोकं म्हणता आहेत पिक्चरमध्ये सत्या आणि श्रावणीचं असं काही रोमँटिक गाणंच नाही आहे. आता गाणं कर.' यावर रितेश म्हणतो, पिक्चर रिलिज झालाय आता काय गाणं कर...' मग शुभंकर त्याला पुन्हा म्हणतो की लोक म्हणताय गाणं कर...

आता मात्र शुभंकरच्या बोलण्यावर रितेशही विचारात पडतो आणि सत्या आणि श्रावणीच्या प्रेम कहानीवर गाणं काढावं असं त्याला वाटतं. आता या जोडीचं एक रोमेंटिक गाणं चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. वेड चित्रपटातील अप्रतिम गाण्यांनतर आणखी एका गाण्याचा आंनद घेण्यासाठी उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinesh Phogat: संपूर्ण सिस्टीम विरुद्ध एकटी विनेश! पराभवानंतर फोडला टाहो; म्हणाली, 'कोणीच माझ्या पाठीशी...

Mumbai News: 1,000 झाडांवर कुऱ्हाड, वर्सोवा दहिसर कोस्टल रोडसाठी वृक्षतोडीला मंजुरी

Karad Crime: कऱ्हाडला ड्रग्जप्रकरणी तिघांना अटक; पावणेतीन लाखांचे एमडी जप्त, २५ लाखांचा अन्य ऐवजही ताब्यात

Washing Machine Tips : क्षमतेपेक्षा जास्त कपडे भरल्यास खराब होऊ शकते वॉशिंग मशीन; एका वेळी किती कपडे धुवावेत? जाणून घ्या

Pune weather: जूनच्या स्वागताला पावसाची चाहूल; पुण्यात मेघगर्जना आणि विजांचा इशारा, नैऋत्य मोसमी पावसाची प्रगती

SCROLL FOR NEXT