Ved Movie Box Office  Esakal
मनोरंजन

Ved Movie: 'वेड'साठी शालिनी ठाकरेंचा 'मनसे' पुढाकार.. अख्ख थिएटरचं केलं बुक..

Vaishali Patil

सध्या अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांचा 'वेड' हा चित्रपट प्रेक्षकांना अक्षरशः वेड करत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करुन बसला आहे. बघबघता या चित्रपटाने चांगलीच बाजी मारत अनेक रेकॉर्ड केले.

या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये इतकी क्रेझ आहे की बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं बक्कळ कमाई केली. प्रदर्शनाच्या दुसऱ्या रविवारी वेडने जमावला 5.70 कोटींचा गल्ला, या आकड्यासह सुपरहीट सैराटचा विक्रम मोडला. 'वेड' या सिनेमाने आतापर्यंत 33.42 कोटींची कमाई केली आहे. वेड चित्रपटाबाबत अजुन एक माहिती मिळाली आहे.

'वेड' चित्रपट पाहण्यासाठी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना तर सगळं थिएटर बूक केलं. शर्मिला ठाकरे या रितेश देशमुख, जेनेलिया यांच्यासोबत एकत्र दिसले.

यावेळी बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या की त्यांना खुप आनंद झाला. ते नेहमी भेटत असतात. जेनेलियाचं दहा-बारा वर्षांपूर्वी लग्न झालं तिला आता दोन मुले आहेत मात्र तिच्या चेहऱ्यावर असं कुठचं दिसत नसल्याचं त्या म्हणाल्या. जेनेलिया ही खूप सुंदर आणि उत्तम अभिनेत्री आहेत. तिनं पुन्हा अभियनाकडं वळावं ते नेहमीच तिला सांगत असायच्या. असं त्या म्हणाल्या. शर्मिला ठाकरे म्हणाल्या, 'रितेशने चित्रपट पाहण्यासाठी मला वेळ मागितला. मी थिएटरचं बूक केलं.'

हेही वाचा: योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

यावर यावेळी रितेश देशमुखनेबा त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणतो की, 'चित्रपट हा माझा किंवा तुमचा असा नसतो. ही एक इंडस्ट्री आहे. ठाकरे यांनी इंडस्ट्रीला आपलं मानल आहे. ती भावना सर्वांनी पुढं नेली पाहिजे. वेड हा प्रेक्षकांचा चित्रपट आहे. तो मोठा होत असेल तर प्रेक्षकांमुळं होतोय. प्रेक्षक थिएटरमध्ये येतात. त्यांना चांगले चित्रपट देण्याची जबाबदारी आमची आहे' अशा भावना त्याने व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parsi Dairy License Suspended : तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! मुंबईतील शंभर वर्षांहून जुन्या पारसी डेअरीचा परवाना निलंबीत; कोट्यावधींचे साहित्य जप्त

Hingoli: कळमनुरीमध्ये गोळीबारात तरुणाचा मृत्यू, चार गंभीर; दोन गटांत वाद, नगरसेवकासह १६ जणांवर गुन्हा

Latest Marathi News Live Update : पुणे- दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार

Ratnagiri Green Steel Project investment : रत्नागिरीत 7 हजार 500 कोटींचे पाच नवे प्रकल्प; उद्योगमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा, 450 एकर जागेत काय-काय होणार?

Jayant Patil Jitendra Awhad Eknath Shinde : जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड रात्रीतून एकनाथ शिंदेंच्या भेटीला, बंद दाराआड ४५ मिनीटांच्या भेटीत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT