Gautami Patil Esakal
मनोरंजन

Gautami Patil: नाशिकमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा! मद्यपींच्या हल्ल्यात पत्रकार गंभीर जखमी

या घटनेला गौतमीला जबाबदार धरून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी

अंकिता खाणे (Ankita Khane)

नाशिकच्या ठक्कर डोम येथे प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा काल लावणीचा कार्यक्रम पार पडला. नवनिर्माण सेवाभावी संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. सगळीकडे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला गर्दी असते. मात्र नाशिकमध्ये प्रेक्षकांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला पाठ फिरवली आहे. कार्यक्रमाचे तिकीट दर जास्त असल्याचे कारण यामागे सांगितले जात आहे. गौतमीच्या कार्यक्रमाला 300 रुपयांपासून ते 2 हजार रुपयांपर्यंतचे तिकीट लावण्यात आले होते.

इतके महागडे तिकीट परवडत नसल्याने तिच्या चाहत्यांचा हिरमोड झाला. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी लोक फिरकलीच नाही. त्यामुळे अल्प गर्दी आणि रिकाम्या खुर्च्यांसमोरच गौतमीला कालचा कार्यक्रम उरकावा लागला. दरम्यान या कार्यक्रमात वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना तेथील उपस्थित मद्यपी तरुणांनी मारहाण केली. या घटनेत पत्रकार गंभीर जखमी झाले आहे.

नृत्य कलाकार गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे नाशिक शहरात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वार्तांकन करण्यासाठी उपस्थित असलेल्या पत्रकारांना येथील मद्यपी कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्यामुळे यामध्ये पत्रकारांना गंभीर दुखापत झाली. या घटनेसाठी सर्वस्वी गौतमी पाटीलला जबाबदार धरून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच नाशिकमध्ये असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी नाशिक जिल्ह्यात गौतमी पाटीलला पूर्णतः बंदी घालण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गर्दी नव्हती. बऱ्याच खुर्च्या रिकाम्या होत्या. पण काही प्रमाणात प्रेक्षक कार्यक्रम पाहण्यासाठी आले होते. आलेल्या प्रेक्षकांनी कार्यक्रम सुरू होताच हुल्लडबाजी सुरू केली. हुल्लडबाजांनी इतका गोंधळ घातला की आयोजकांना वारंवार कार्यक्रम बंद पाडण्याचा इशारा द्यावा लागला. पण तरीही हुल्लडबाज काही ऐकायला तयार नव्हते. अखेर गौतमीच्या सुरक्षारक्षकांना या हुल्लडबाजांना चोप द्यावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricket Australia: IND मध्ये रंगणार AUS vs ENG कसोटी? क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या CEO ने दिले मोठे संकेत; BCCI सोबत चर्चेची शक्यता

ऐकावं ते नवलंच! तो पत्नीवर २० वर्ष रुसला, एकही शब्द नाही बोलला; कारण काय तर...

मोठी बातमी! CJP च्या दोन मागण्या सरकारकडून मान्य, तिसरीसाठी उद्या पर्यंतची मागितली वेळ, धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार?

Ashadhi Ekadashi Special: १५ मिनिटांत बनवा कुरकुरीत आणि चटपटीत 'उपवासाची कचोरी'!

WI vs PAK Test: वेस्ट इंडिजच्या स्टार खेळाडूने पाकिस्तानविरुद्ध कसोटी खेळण्यास दिला नकार! प्रशिक्षक डॅरेन सॅमीने सर्व काही खरं सांगितलं

SCROLL FOR NEXT