megha dhade bjp entry politics her first reaction after join bhartiya janata party SAKAL
मनोरंजन

Megha Dhade: भाजप जगातला बलशाली पक्ष, पक्षप्रवेशानंतर मेघा धाडेची पहिली प्रतिक्रिया

मेघाने BJP मध्ये प्रवेश केल्याने आणखी एका अभिनेत्रीने राजकारणात प्रवेश केलाय.

Devendra Jadhav

Megha Dhade in BJP News: बिग बॉस मराठी १ ची विजेती आणि अभिनेत्री मेघा धाडे हिची वेगळीच चर्चा सुरु झालीय. मेघाने भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केलाय. मेघा BJP प्रवेशामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मराठी कलाकार विविध राजकीय पक्षात प्रवेश करत आहेत. काहीच दिवसांपूर्वी निळू फुलेंची लेक गार्गी फुले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता मेघाने BJP मध्ये प्रवेश केल्याने आणखी एका अभिनेत्रीने राजकारणात प्रवेश केलाय.

BJP मध्ये प्रवेश केल्यानंतर मेघाने भावना व्यक्त केल्यात.. मेघा लिहिते.. "नमस्कार वंदे मातरम ! मला आपणास सगळ्यांना कळवण्यास अत्यंत आनंद होतोय की ,

तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि शुभेच्छांनी मी माझा आवडता आणि जगातला सगळ्यात मोठा बलशाली पक्ष म्हणजेच भारतीय जनता पार्टीत रीतसर प्रवेश केला आहे .

मेघाने फोटो पोस्ट करून पुढे लिहिलंय की.."हे मी माझे अहोभाग्य समजते की काल ज्यांच्या उपस्थितीत माझी प्रवेश प्रक्रिया पार पडली ते भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब ,

महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री विक्रांत जी पाटील , महामंत्री श्री विजयजी चौधरी व सांस्कृतिक प्रकोष्टच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्रीमती प्रियाताई बेर्डे यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने हा प्रवेश प्रक्रियेचा कार्यक्रम पार पडला.

मेघा शेवटी लिहिते.. "आता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली छान कामगिरी करून दाखवायचीआहे . समाजसेवेसाठी घेतलेल्या व्रताचे आता पुरेपूर पालन करायचे आहे.

एका सुदृढ आणि सुशिक्षित सुसंस्कृत समाजाचं जे आपलं ध्येय आहे ते घेऊन आता जोमात कामाला लागायचा आहे ,

तेव्हा तुम्हा सगळ्यांचे ही आशीर्वाद आणि शुभेच्छा कायम माझ्यासोबत असू द्या हीच विनंती आणि अपेक्षा आहे .धन्यवाद.

जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय" अशा प्रकारे मेघाने भावना व्यक्त केल्यात. आता मेघा BJP त राहून कसं काम करणार हे पुढच्या काळात पाहायला मिळेलच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif vs Shivaji Patil : 'शिवाजीराव मुक्त गोकुळ त्यांना करायचे का?' महायुतीच्या गोकुळमधील पॅनेलवर आमदार शिवाजी पाटलांनी केले वक्तव्य

Latest Marathi News Live Update : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी

Pune Crime: 'माझा गुन्हा का दाखल केला नाही?' संतापलेल्या महिलेचा पोलिस चौकीत धिंगाणा, वैद्यकीय अहवालात मोठा खुलासा

Mumbai : पावसाने रस्ते निसरडे झाले, अपघातामुळे वाहनांच्या रांगा; तर ओव्हर हेड वायर तुटून मध्य रेल्वेचाही खोळंबा

Accident News : मध्यरात्री भीषण अपघात ! कार ५०० मीटर खोल दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT