mohammed Shami's wife's statement before the india World Cup final is in discussion SAKAL
मनोरंजन

Ind vs Aus WC 2023: तो खेळाडू म्हणुन चांगला, पण माणूस म्हणून... वर्ल्डकप फायनलआधीच शमीच्या बायकोचं विधान चर्चेत

मोहम्मद शमीच्या बायकोने फायनलआधीच केलेलं विधान चर्चेत आह

Devendra Jadhav

Mohammed Shami Ind vs Aus WC 2023 News: उद्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया फायनलची मॅच रंगणार आहे. क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताच्या मोहम्मद शमीने उत्कृष्ट गोलंदाजी करत भारताच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली.

उद्या रंगणाऱ्या फायनलमध्ये मोहम्मद शमीच्या गोलंदाजीकडे सर्वांचं लक्ष आहे. अशातच शमीच्या बायकोने त्याच्याबद्दल काही विधानं केली आहेत, जी चर्चेत आहेत.

मोहम्मद शमीची बायको हसीन जहाँने त्याच्यावर अनेक आरोप लावले. दोघंही सध्या वेगळं राहतात. दोघांमध्ये अनेक मतभेद आहेत. हसीनने UP TAK ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की, कधी-कधी मनात हे विचार येतात, तो जितका चांगला खेळाडू असतो, तितकाच तो चांगला माणूस असता, तर मी, माझी मुलगी आम्ही आनंदी जीवन जगू शकलो असतो.

हसीन जहाँने पुढे सांगितले की, "शमीच्या लोभी आणि घाणेरड्या मनाचा आम्हाला सामना करावा लागला आहे. मात्र, सध्या जे काही समोर येत आहे, ते पैसे देऊन खऱ्या गोष्टी लपवण्याचा एक प्रयत्न आहे."

शमी सध्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे असं विचारताच हसीन जहाँ म्हणाली, हे आवश्यक नाही की, जर तो आता क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत असेल तर तो खऱ्या आयुष्यातही तसाच असेल. त्याची सध्या चांगली वेळ सुरु आहे. पण ही वेळ कायम राहील असं मला वाटत नाही. प्रोफेशनल लाइफमध्ये तो चांगली कामगिरी करत आहे, वैयक्तिक आयुष्यात त्याने खूप वाईट केले आहे. अशा शब्दात हसीनने मनातली खदखद व्यक्त केली.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप फायनल मध्ये शमीकडे लक्ष

भारताने न्युझीलंडला सेमीफायनलमध्ये हरवुन वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मजल मारली. यावेळी मोहम्मद शमीने एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल सात विकेट घेतल्या.

रविवारी १९ नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट वर्ल्डकप फायनल रंगणार आहे. या सामन्यात मोहम्मद शमी गोलंदाजीची जादू कशी दाखवणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT