mukta barve shared bad experience of pohe she order in shree datta snacks in nashik  SAKAL
मनोरंजन

Mukta Barve: "नाशिकला जाताना पोहे मागवले आणि...", मुक्ता बर्वेला आलेला वाईट अनुभव वाचा

मुक्ता बर्वेने नाशिक पडघा टोलजवळ आलेला पोह्यांचा वाईट अनुभव सांगितला आहे

Devendra Jadhav

Mukta Barve News: मुक्ता बर्वे ही मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेत्री. मुक्ताने आजवर अनेक सिनेमा, मालिका, नाटकांमधून स्वतःची छाप पाडली. मुक्ता बर्वे ही मराठी मनोरंजन विश्वातील संवेदनशील अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

मुक्ता बर्वे सोशल मिडियावर विविध विषयांवर पोस्ट शेअर करत असते. अशातच मुक्ताने तिला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल पोस्ट शेअर केलीय.

(mukta barve shared bad experience of pohe she order in shree datta snacks in nashik)

मुक्ताने सोशल मिडियावर पोह्यांच्या डिशचा एक फोटो पोस्ट केलाय. हा फोटो पोस्ट करुन मुक्ता लिहीते,"माझा विश्वासच बसेना! खरं तर मी ‘श्री दत्त स्नॅक्स’ ची फॅन आहे. मुंबई-पुणे करताना अनेकदा तिथे आवर्जून खाण्याचा ब्रेक घेते मी. आज नाशिक ला जाताना पडघा टोल नंतर खूप कौतुकानी थांबले आणि पोहे मागवले. अत्यंत अनास्थेनी , गरम असल्याचा भास होईल एवढेच जेमतेम गरम पोहे त्यांनी दिले. आणि कमिटमेंट एवढी की पोहे म्हणजे फक्त पोहे. कांदा-मीठ आणि साखर बास!

मुक्ता पुढे लिहीते, "जरा चव यावी म्हणुन कदाचित शेंगदाणे, शेव, कोथिंबीर, गेलाबाजार लिंबू .. यातलं काहिच नाही. पैसे वाया गेल्याच्या दुःखापेक्षा भूक लागलेली असताना समोरच्या डीश मधे कोणीतरी एवढी अनास्था वाढुन दिली याचं वाईट वाटलं."

मुक्ताच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. मुक्ताला आलेल्या वाईट अनुभवाचं अनेकांनी समर्थन केलंय.

मुक्ता बर्वे सध्या चारचौघी नाटकात काम करतेय. या नाटकाचे सध्या दणक्यात प्रयोग सुरु आहेत. या नाटकात मुक्ता बर्वे सोबत पर्ण पेठे, रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम असे कलाकार झळकत आहेत.

याशिवाय मुक्ताची भूमिका असलेल्या रावसाहेब या सिनेमाचा थरारक टीझर भेटीला आलाय. रावसाहेबची रिलिज डेट अजून समोर आली नसली तरीही सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT