kangna on sushant 
मनोरंजन

सुशांत आत्महत्या प्रकरणात आता होणार कंगना रनौतची चौकशी...

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- सुशांत आत्महत्या प्रकरणात आत्तापर्यंत ३५ जणांचे जबाब नोंदवून झाले आहेत. संजय लीला भन्साळी, आदित्य चोप्रा, मुकेश छाब्रा यांसारख्या बॉलीवूडमधील मोठ्या हस्तींची देखील पोलिसांनी चौकशी केली आहे. आता या प्रकरणात अभिनेत्री कंगना रनौतची चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

एका प्रसिद्ध वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, कंगना रनौत सध्या मुंबईबाहेर आहे. ती हिमाचल प्रदेशमध्ये तिच्या घरी कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात कंगनाला चौकशी दरम्यान असे काही प्रश्न विचारले जाऊ शकतात की तिच्याकडे अशी काही माहिती उपलब्ध आहे का ज्यामुळे सुशांतने आत्महत्या का केली असावी याचा उत्तर मिळेल?

कंगनाचा जबाब या केसमध्ये महत्वाचा असल्याचं म्हटलं जातंय. कारण तिच्या काही मुद्द्यांमधून महत्वाची माहिती समोर येण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जातंय.  इतकंच नाही तर अशा काही लोकांबद्दल माहिती मिळू शकते जे सुशांतचं करिअर, त्याची ओळख मिटवण्याचा प्रयत्न करत होते. 

कंगना रनौतला गेल्या महिन्यात बांद्रा पोलिसांनी चौकशीसाठी नोटिस पाठवली होती. मात्र कंगना घरात नसल्याने तिच्या घरातील कर्मचा-यांकडे ही नोटिस देण्यात आली होती. आता जेव्हा कंगना तिच्या हिमाचल प्रदेश येथील घरुन परत मुंबईला येईल तेव्हा तिची चौकशी होऊ शकते. 

सुशांतच्या आत्महत्येवर प्रतिक्रिया देताना कंगनाने ही हत्या असल्याचा दावा केला होता. तसंच बॉलीवूडमधील घराणेशाही आणि मक्तेदारीच्या मुद्द्यावर प्रकाश टाकला होता. नुकत्याच एका मुलाखतीत कंगनाने म्हटलंय, सुशांत विरुद्ध एक कट आखला गेला होता ज्यामुळे तो मानसिक दृष्ट्या खचून जाईल आणि त्याच करिअर संपूष्टात आणलं जाऊ शकेल.   

mumbai police will interrogate kangana ranaut in sushant singh rajput case  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT