namrata sambherao emotional post on prasad khendekar marathi movie SAKAL
मनोरंजन

Namrata Sambherao: "तुझ्या अनेक स्वप्नांपैकी एक स्वप्न..", प्रसादसाठी नम्रताची भावूक पोस्ट

प्रसाद खांडेकर दिग्दर्शित एकदा येऊन तर बघा सिनेमा उद्यापासुन संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय

Devendra Jadhav

Namrata Sambherao News: प्रसाद खांडेकर दिग्दर्शित 'एकदा येऊन तर बघा सिनेमा' उद्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. या सिनेमाची गेल्या अनेक महिन्यांपासुन चर्चा आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रामधील अनेक कलाकार या सिनेमात सहभागी आहेत.

प्रसादचा दिग्दर्शक म्हणुन एकदा येऊन तर बघा हा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमात नम्रता संभेराव सुद्धा विशेष भुमिकेत झळकणार आहे. नम्रताने या सिनेमानिमित्ताने प्रसादसाठी खास पोस्ट लिहीली आहे.

(namrata sambherao emotional post on prasad khendekar marathi movie)

नम्रताने सोशल मीडियावर प्रसादसोबतचा फोटो पोस्ट केलाय. हा फोटो पोस्ट करुन नम्रता लिहीते, "फाल्गुन अश्विनी.. उद्या तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस, तू दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा प्रदर्शित होतोय , तुझं अनेक स्वप्नांपैकी एक स्वप्न पूर्ण होतंय, तुला खूप शुभेच्छा पश्या . कमाल झालाय सिनेमा , पहिला चित्रपट जर असा असेल तर इथून पुढचे सगळे चित्रपट तू असेच यशस्वीरीत्या दिग्दर्शित करशील ह्याची खात्री आहे मला , त्याची मी साक्षीदार आहे ह्याचा अतोनात आनंद होतोय , असंच passionately काम करत रहा."

नम्रता पुढे लिहीते, "तुझ्यातली सकारात्मक ऊर्जा खूप शिकवून जाते नेहमीच , असाच रहा खूप मोठा हो , चित्रपट दिग्दर्शकांच्या फळीत आता तुझंही नाव लागणार, खूप अभिमान वाटतोय तुझा तुला पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा पश्या ८ डिसेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात बघायला नक्की जा बुक माय शोवर tickets available आहेत लवकरात लवकर तिकिट्स बुक करा आणि एक धमाल laughter ride अनुभवा."

दिग्गज कलाकारांची फौज

एकदा येऊन तर बघा सिनेमात दिग्गज कलाकारांची फौज आहे. सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार, ओंकार भोजने, भाऊ कदम, वनिता खरात, रोहित माने असे कलाकार आहेत.

या सिनेमाचं लेखन - दिग्दर्शन प्रसादने केलं असुन स्वतः प्रसाद खांडेकर सुद्धा सिनेमात भुमिका साकारणार आहे. हा सिनेमा उद्या ८ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Nepal Dispute: भारताचं महत्त्व नेपाळला उमगलं! तणावानंतर आता मैत्रीचा हात; बालेन शाहांनी वाढवला राजनैतिक संवाद

Google मध्ये पुन्हा मोठी कपात! अनेक कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; टेक इंडस्ट्रीत अस्थिरता कायम

IND vs AFG: अफगाणिस्तानविरुद्ध कशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन? कधी आणि कुठे होणार सामना, जाणून घ्या

Palghar News: पालघरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, महिला डॉक्टरचा जागीच मृत्यू

'लग्नानंतर होईलच प्रेम'ची पार्टी अन् 'झिंगाट'वर थिरकली मृणाल दुसानिस; जबरदस्त डान्स पाहून चाहते म्हणाले- अरे ही तर...

SCROLL FOR NEXT