Nana Patekar Comment On BJP 2024 Election esakal
मनोरंजन

Nana Patekar Comment On 2024 Election : 'पुन्हा बीजेपीच येणार, पर्याय आहे कुठं'? नानांनी स्पष्टच सांगितलं!

नाना प्रसिद्ध दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये बिझी असल्याचे दिसून आले होते.

युगंधर ताजणे

Nana Patekar Comment On BJP 2024 Election : प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर हे नेहमीच त्यांच्या आक्रमक आणि परखड वक्तव्यांसाठी ओळखले जातात. कुणाला काय वाटेल या भीतीपोटी नाना कधीही बोलत नाही. आपल्याला जे योग्य वाटेल ते मोठ्या हिंमतीनं बोलणाऱ्या नानांनी पुन्हा एकदा एक राजकीय वक्तव्य करुन लक्ष वेधून घेतले आहे.

या वर्षी नानांचा द व्हॅक्सीन वॉर नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेल्या त्या चित्रपटामध्ये नानांनी साकारलेल्या शास्त्रज्ञाच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी, चाहत्यांनी कौतुकही केले होते. त्यानंतर नाना प्रसिद्ध दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये बिझी असल्याचे दिसून आले होते. याच चित्रपटातील एका दृश्याचे चित्रिकरण सुरु असताना झालेल्या प्रकारानं नाना ट्रोल झाले होते.

त्या व्हिडिओमुळे नानांना दिलगिरी देखील व्यक्त करावी लागली होती. आता नानांनी आगामी काळातील निवडणूका आणि राजकीय परिस्थिती यावर केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. यावेळी नानांनी कोणता पक्ष निवडून येणार आणि कोण पंतप्रधान होणार याविषयी भाष्य केलं आहे. त्या व्हिडिओची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. नाना काय म्हणाले हे आपण जाणून घेणार आहोत.

झी बिझनेसला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये नानांना आगामी काळातील निवडणूकांविषयी विचारण्यात आले. नाना तुम्हाला काय वाटतं कोणता पक्ष पुन्हा सत्तेवर असेल, कोण जिंकेल, या प्रश्नावर नानांनी दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे. नाना म्हणाले, मला वाटतं बीजेपी पुन्हा एक मोठा विजय संपादन करेल. २०२४ च्या निवडणूकीमध्ये त्यांची सरशी होईल.

बीजेपीला किती जागा मिळतील यावर नाना म्हणाले ३७५ ते ४०० जागा बीजेपीला मिळतील. तुम्ही किती मोठ्या फरकानं बीजेपी पक्ष पुन्हा सत्तेवर येतो ते... त्याचं दुसरं एक कारण म्हणजे आपल्याकडे बीजेपीशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच दिसतील. असेही नानांनी यावेळी सांगितले.

नानांच्या व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. अनेकांनी नानांच्या भूमिकेचे कौतुक केले आहे तर कित्येकांनी नानांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: एकनाथ शिंदेंच्या मागे कोणता डाव? जरांगेंचा पुन्हा गौप्यस्फोट; हातात काय लागलं? कदमांच्या एका वक्तव्याने नवा संशय!

BEST Bus Employees: बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार? बोनसबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार

India Economic Growth: भारताची विकासगाथा प्रभावी; रायशे यांचे प्रतिपादन; द्विपक्षीय सहकार्यावरही भर

Marathi News Live Updates: देवेंद्र फडणवीस यांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बजावला मतदानाचा हक्क

'मी आधी सुप्रियाच्या कामाच्या प्रेमात पडलो मग तिच्या' बायकोबद्दल बोलताना सचिन पिळगांवकर म्हणाले...'ती माझ्यापेक्षा खूप...'

SCROLL FOR NEXT