Nana Patekar slapped a fan who came to take a selfie on journey set, SAKAL
मनोरंजन

Nana Patekar: सेल्फी घ्यायला आलेल्या फॅनला नाना पाटेकरांनी जोरात लगावली, व्हिडीओ व्हायरल

नाना पाटेकर यांनी रागाच्या भरात एका फॅनला जोरात लगावली आहे, व्हिडीओ व्हायरल

Devendra Jadhav

Nana Patekar Viral Video: नाना पाटेकर हे हिंदी - मराठी मनोरंजन विश्वातले दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेते. नाना पाटेकर यांनी आजवर विविध सिनेमांमधुन प्रेक्षकांंचं मनोरंजन केलंय.

नाना पाटेकर यांचा स्वभाव सर्वांना माहितच आहे. नाना अनेकदा त्यांच्या रोखठोक आणि सडेतोड वागण्या - बोलण्याने चर्चेत असतात. नाना पाटेकरांचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यावेळी सेल्फी घ्यायला आलेल्या फॅनला नानांनी जोरात लगावली आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय.

नानांनी फॅनला जोरात लगावली

चित्रपट अभिनेते नाना पाटेकर हे सध्या उत्तर प्रदेशातील काशी येथे शुटींग करत आहेत. यासंबंधीचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नाना पाटेकर शूटिंगच्या ठिकाणी एका सीनसाठी रेडी होत आहेत.

तेवढ्यात एक तरुण येऊन त्यांच्याजवळ उभा राहतो आणि सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो. नाना पाटेकर रागाच्या भरात त्याला जोरात लगावतात. पुढे युनिटमधली माणसं त्या तरुणाला बाहेर काढतात. नानांच राग अनावर झालेला दिसतो.

वाराणसीतील दशाश्वमेध घाटावर नानां सध्या त्यांच्या जर्नी चित्रपटाचे शूटिंग सुरू करत आहेत. या ठिकाणी हा किस्सा घडला. या सिनेमाची सध्या खुप चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : दिल्ली पोलिसांकडून 'एक्सपायर्ड' अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर? व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ

Commonwealth Games 2026: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी ५३ कोटींचा खर्च; क्रीडा मंत्रालयाकडून ॲथलेटिक्स, बॉक्सिंगला प्राधान्य

'देशविरोधी शक्तींनी आंदोलन हायजॅक करू नये' दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर प्रीती झिंटा म्हणाली...'आंदोलनाचा गैरफायदा घेऊ नका'

Live Updates Marathi : महादेव जानकर, राजू शेट्टींनी घेतली आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट

Amravati News: शासकीय योजनेतील विहीर गेली चोरीला; गावकऱ्यांची पोलिस ठाण्यात धाव

SCROLL FOR NEXT