navazuddin with wife aaliya 
मनोरंजन

नवाजुद्दीन सिद्दीकीविरोधात पत्नी आलियाने बलात्कार आणि फसवणूकीची दाखल केली तक्रार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई- बॉलीवुडमधील आणखी एका पती पत्नीचं भांडण आता समोर आले आहे. स्टार अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया हिने त्याच्या विरोधात बलात्कार आणि फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी तिने मुंबईतील वर्सोवा  पोलीस ठाण्यात तक्रार दिली असुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. दोन दिवसांपुर्वीच मॉडेल पुनम पांडे हिने नव-याविरोधात पोलिसांकडे धाव घेतली होती. 

बॉलीवुडमध्ये सध्या एकामागुन एक वेगवेगळ्या धक्कादायक गोष्टी घडताना दिसत आहे. अभिनेत्री पायल घोष हिने देखील दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. या अगोदर अलियाने नवाजुददीनच्या भावावर छेडछाड केल्याचा आरोप केला होता. अलिया हे सगळे पैशांसाठी करत असल्याचे नवाजुददीनच्या भावाने सांगितले होते. एका मुलाखतीत मात्र अलियाने हे आरोप फेटाळुन लावले होते.

नवाजुददीनच्या विरोधात तक्रार व आरोप करण्याची आलियाची ही काही पहिली वेळ नाही. यापुर्वीही त्यांच्यातील वाद सोशल मीडियातुन समोर आले आहेत. ब-याच काळापासुन त्यांच्यात हे वाद सुरु आहेत. काही दिवसांपूर्वीच आलियाने नवाजुद्दीनच्या गावी जाऊन त्याच्याविषयीची तक्रार दाखल केली होती.

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आलियाने म्हटलंय, 'ज्यावेळी आम्ही एकमेकांना डेट करत होतो आणि पुढे लग्न करण्याचा निर्णय घेतला त्या दरम्यान नवाजुद्दीन आणखी दुस-या मुलीच्या संपर्कात होता. यावरुन आमच्यात वाद सुरु झाले. मी गरोदर असताना एकटीच डाँक्टरकडे जात होते. अशा परिस्थितीत माझ्याबरोबर कोणीही नव्हते. पुढे मला जास्त त्रास जाणवु लागल्यानंतर नवाजुद्दीनचे आई वडील बरोबर होते. अशावेळी नवाजुद्दीन आपल्या गर्लफ्रेंडसोबत फोनवर बोलण्यात बिझी होता.

संपादन: दिपाली राणे-म्हात्रे

nawazuddin siddiquis wife accuses the actor of rape and cheating files complaint  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT