Nitin Chandrakant Desai Death Case Khalapur Police esakal
मनोरंजन

Nitin Desai : नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात पहिला गुन्हा दाखल! कोण आहेत ते?

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्ये प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युगंधर ताजणे

Nitin Chandrakant Desai Death Case Khalapur Police : प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या घटनेची पोलिसांनी तातडीनं दखल घेऊन त्याचा तपास सुरु केला होता. आता त्यामध्ये एकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

नितीन देसाई यांनी त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये काल आत्महत्या केली होती. त्यानंतर बॉलीवूडविश्वात मोठी खळबळ उडाली होती. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ आपल्या कलाकृतींनीं त्यांना प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले होते. त्यात त्यांचे जाणे हे अनेकांच्या मनाला चटका लावून जाणारे होते. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देसाई यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले याविषयी वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली होती.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्ये प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ECL finanace कंपनीच्या एडेलवाईस ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे. कर्जाच्या परतफेडीसाठी सातत्यानं तगादा लावत मानसिक त्रास दिला. असे त्या तक्रारीत म्हटले गेले आहे. त्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

देसाई यांच्या या प्रकरणाची खालापूर पोलीस ठाण्यात कलम ३०६ आणि ३४ अंतर्गत नोंद घेण्यात आली असून त्यात एकूण पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : जैन मुनि नयपद सागर यांच्या ताराराणींबाबतच्या वक्तव्यावरून वाद वाढला

मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...

'दारु प्यायचो, मासांहार करायचो, दिवसाला 200 सिगारेट ओढायचो' अमिताभ बच्चन यांनी केलेला खुलासा, म्हणालेले...'इतकी दारू प्यायचो की...'

2011 World Cup India Team: २०११ फायलनच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील हिरो आत्ता काय करतात, दोन खेळाडू अद्यापही IPL खेळतात

SCROLL FOR NEXT