yo yo honey singh 
मनोरंजन

'कायद्यापेक्षा मोठं कोणीच नाही'; कोर्टाने हनी सिंगला फटकारलं

पत्नीने केला कौटुंबिक अत्याचाराचा आरोप

स्वाती वेमूल

'कायद्यापेक्षा मोठं कोणीच नाही', अशा शब्दांत दिल्लीच्या स्थानिक न्यायालयाने गायक यो यो हनी सिंगला Honey Singh फटकारलं. पत्नी शालिनी तलवारने Shalini Talwar त्याच्याविरोधात दाखल केलेल्या कौटुंबिक अत्याचाराच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान हनी सिंग गैरहजर होता. न्यायालयाने हनी सिंगला येत्या ३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 'हनी सिंग कोर्टात हजर नाही. तुम्ही त्याच्या उत्पन्नाचे प्रतिज्ञापत्र दाखल केले नाही आणि युक्तिवादांसाठी तयार नाही. हे प्रकरण इतक्या हलक्यात कसं घेतलं जातंय, याचं आश्चर्य वाटतं. कोणीही कायद्यापेक्षा मोठं वर नाही', असं महानगर दंडाधिकारी तानिया सिंग यांनी हनी सिंगच्या वकिलाला सुनावलं.

कोर्टाने यो यो हनी सिंगचा वैद्यकीय अहवाल आणि त्याच्या आयकर परताव्याचा तपशीलही मागितला आहे. हनी सिंगचे वकील म्हणाले की ते लवकरात लवकर त्याचे वैद्यकीय रेकॉर्ड आणि इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करतील. प्रकृती ठीक नसल्याचं कारण देत हनी सिंगने न्यायालयात हजर राहिला नाही. मात्र सुनावणीच्या पुढील तारखेला तो हजर राहील असं आश्वासन त्याच्या वकिलाने न्यायालयाला दिलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

यो यो हनी सिंगवर पत्नी शालिनी तलवारने लैंगिक छळ, कौटुंबिक हिंसाचार आणि मानसिक छळ असे गंभीर आरोप केले आहेत. शालिनीने दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात याचिका दाखल केली. पतीने आपल्याला अनेकदा मारहाण केली. तो आणि त्याचे कुटुंबीय मला शारीरिक इजा पोहोचवतील या भीतीच्या छायेखाली मी सतत वावरत होते, असे शालिनीने सांगितले. हनी सिंगकडून होणाऱ्या या छळामुळे आपण नैराश्यात गेलो तसेच आपल्याला वैद्यकीय मदतीची गरज लागली, असे शालिनी तलवारने म्हटले आहे. तिने हनी सिंगवर फसवणुकीचाही आरोप केला आहे. त्याचे अनेक महिलांसोबत शरीरसंबंध असल्याचा आरोप तिने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT