काम्या पंजाबी  
मनोरंजन

'माझ्या मुलीबद्दल बोलाल, तर गळा चिरीन', काम्या पंजाबीचा संताप

'मला म्हातारी, घटस्फोटीत म्हणा, फरक पडत नाही'

दीनानाथ परब

मुंबई: बिग बॉसची (Big boss) माजी स्पर्धक आणि अभिनेत्री काम्या पंजाबी (Kamya Panjabi) मनापासून आणि बिनधास्त बोलण्यासाठी ओळखली जाते. काम्या पंजाबीचा मोठा चाहता वर्ग आहे, तरीही सोशल मीडियावर (Social media) काही वेळा तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल (Troll) केलं जातं. अलीकडेच काम्याने या ट्रोलिंगला त्याच भाषेत उत्तर दिले. सेलिब्रिटी चॅट शो मध्ये अभिनेत्री निया शर्मा बॉडी शेमिंग आणि ट्रोलिंग बद्दल बोलत होती.

काम्याने सुद्धा या विषयावर मोकळेपणाने तिची मतं मांडली. ट्रोलिंगचे तिने काही व्यक्तीगत अनुभव सांगितले. पहिलं लग्न मोडल्यानंतर काम्या दुसऱ्यांदा कोणाच्यातरी प्रेमात पडली. त्या रिलेशनशिपवरुन तिला अत्यंत निदर्यतेने ट्रोल करण्यात आलं. तो अनुभव सांगताना काम्या पंजाबी भावनिक झाली होती. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

"माझं पहिलं लग्न मोडलं. मला घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागला. त्यानंतर मी दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये होते. त्यावरुनही मला ट्रोल करण्यात आलं. ट्रोलर्सनी मला म्हातारी, घटस्फोटीत, नवीन प्रियकर मला सोडून देईल" असं म्हटलं होतं. काही ट्रोलर्सनी तिच्या मुलीलाही टार्गेट करण्याचा प्रयत्न केला.

"माझी मुलगी माझं आयुष्य आहे. तुम्हाला हवं तसं तुम्ही भुंकू शकता. मला त्याची पर्वा नाही. पण तुम्ही माझ्या मुलीबद्दल काही बोलणार असाल, तर मी तुमचा गळा चिरीन" अशी संतप्त भावना काम्याने ट्रोलिंगवर व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS ENG 2ND ODI: जो रूट भिडला, इंग्लंडला विजय मिळवून दिला! भारताच्या पराभवामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी

NEET-UG results: 'नीट'चा निकाल जाहीर; 11.25 लाख विद्यार्थी पात्र; 17 टॉपर्समध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश

Ashadhi Wari : काटेवाडी अंगणी धावल्या मेंढ्या रिंगणी; तुकोबांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत; विठ्ठलनामाने दुमदुमला आसमंत

Rohit Sharma : वैभव सूर्यवंशी, इशान किशन अन् तो! रोहितचा उत्तराधिकारी म्हणून BCCI कोणाला संधी देणार? एक खेळाडू जो केव्हापासून संधीच्या शोधात होता...

Junnar Tree Plantation: जुन्नरमध्ये अँड संजयराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; सहकार क्षेत्रातील योगदानाची गौरवमाला

SCROLL FOR NEXT