Pakistani actress Nausheen Shah wants to slap Kangana Ranaut Esakal
मनोरंजन

Kangana-Nausheen: मला कंगनाच्या कानाखाली मारायचीय! पाकिस्तानी अभिनेत्री इतकी का भडकली?

Vaishali Patil

Pakistani actress Nausheen Shah wants to slap Kangana Ranaut viral: बॉलिवूडची पंगा क्विन म्हणजेच कंगना रणौत ही नेहमी चर्चेत असते. ती केवळ तिच्या चित्रपटामुळेच नाही तर तिच्या वक्तव्यामुळे देखील लाईमलाईटमध्ये राहते.

बऱ्याचदा तिला तिच्या वक्तव्यांमुळे वादाचा आणि ट्रोलिंगचा सामनाही करावा लागतो. त्यातच आता कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे मात्र यावेळी कारण तिचं काही वक्तव्य नाही तर ती एका पाकिस्तानी अभिनेत्रीमुळे चर्चेचं कारण ठरली आहे.

त्याच झालं असं की, नुकतीच पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री नौशीन शाह हिने एका मुलाखतीत कंगना राणौतवर टीका केली आहे. इतकच नाही तर कंगनाला इतरांचा आदर नाही आणि तिला कंगनाच्या कानाखाली मारायची आहे अशी इच्छाही तिने व्यक्त केली आहे. त्यामुळे आता नौशीन शाह ही देखील वादात सापडली आहे. नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.

हद कर दी या पाकिस्तानी चॅट शो मध्ये अभिनेत्री नौशीन शाह ही मोमीन साकिबसोबत दिसली. या शोमध्ये तिला बॉलिवूड अभिनेत्रीला भेटण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी तिने कंगनाचं नाव घेतलं.

ती म्हणाली की, मला कंगनाला भेटून तिला कानखाली मारायची आहे. ती ज्याप्रकारे माझ्या देशाबद्दल वाईट बोलत असते. ती पाकिस्तानी लष्कराबद्दल वाईट साईट बालते. तिच्या धाडसाचं मी कौतुक करते पण तिला हे कळत नाही की ती दुसऱ्याच्या देशाबद्दल वाईट बोलतेय.

इतकच नाही तर तिने कंगनाला सल्लाही दिला आहे. पुढे ती म्हणाली की, 'तुम्ही तुमच्या देशावर लक्ष केंद्रित करा, तुमच्या अभिनयावर लक्ष केंद्रित करा, तुझं दिग्दर्शन, तुझा वाद आणि तुमचा एक्स बॉयफ्रेंड यागोष्टींवर लक्ष द्या.'

नौशीन शाह पुढे म्हणते की, पाकिस्तानातील लोकांसोबत गैरवर्तन होते आहे हे तुम्हाला कसं कळतं? तुम्हाला पाकिस्तानी लष्कराबद्दल माहिती कशी मिळते? तुम्हाला आमच्या एजन्सीबद्दल माहिती कशी? इथे आम्हाला स्वतःला याबाबत माहिती नाही, एजन्सी आमच्या देशात आहेत, सैन्य आमच्या देशाचं आहे, ते या गोष्टी आमच्याशी शेअर करत नाहीत. हे एक सिक्रेट आहे, नाही का?

नौशीनने कंगनावर टीका केली कर दुसरीकडे तिच्या अभिनयाचं कौतुकही केलं. ती म्हणाली की कंगना एक अद्भुत आणि सुंदर अभिनेत्री आहे, ती एक अतिशय सुंदर महिला आहे परंतु माफ करा, जेव्हा इतर लोक आणि देशांचा आदर करण्याचा विचार येतो त्यावेळी ती खूप वाईट आहे . आता अभिनेत्रीचं हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काहींनी नौशीनला पाठिंबा दिला आहे तर काहींनी तिची खिल्ली उडवली आहे. मात्र अद्याप कंगनाने याबाबत काही वक्तव्य केलेलं नाही.

कंगनाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती पी वासू दिग्दर्शित 'चंद्रमुखी 2' मध्ये दिसणार आहे. त्यासोबतच ती 'तेजस' आणि 'इमर्जन्सी' या चित्रपटातही दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Transport: महाराष्ट्रात बेकायदेशीर वाहतुकीवर सर्जिकल स्ट्राईक! राज्यव्यापी धडक मोहीम सुरू; अंमलबजावणी कधीपासून?

टॉपची कलाकार आणि कोट्यवधींची कमाई असूनही भाड्याच्या घरात राहते ही अभिनेत्री ; महिन्याचं भाडं वाचून बसेल धक्का !

Protein Benefits: फक्त बॉडीसाठी नव्हे, तर दैनंदिन आरोग्य टिकवण्यासाठीही प्रोटीन अत्यंत गरजेचं! जाणून घ्या कारणे

Horscope : उद्यापासून धनदौलत योग! 'या' 5 राशींचा सुवर्णकाळ सुरू; नोकरी-व्यवसायात मोठी संधी, अडकलेल्या कामात मिळेल नशिबाची साथ

फी न भरल्याने आठवीतील विद्यार्थ्याला परीक्षेस मज्जाव, शाळेच्या कारवाईविरोधात कडक पाऊल उचलण्याचा इशारा, पनवेलमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT