Parineeti Chopra, Raghav Chadha, Parineeti-Raghav Wedding esakal
मनोरंजन

Parineeti-Raghav Wedding: लग्नाची पत्रिका आली! ताजमध्ये होणार 'जश्न ए शादी', पण...!

सोशल मीडियावर परिणीती आणि राघव यांच्या लग्नाची पत्रिका नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्यावरुन वेगवेगळया चर्चांना उधाण आले आहे.

युगंधर ताजणे

Parineeti Chopra, Raghav Chadha, Parineeti-Raghav Wedding: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते राघव चढ्ढा यांच्या लग्नाची बातमी आता समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या लग्नाची तारीख आणि स्थळ याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांना उधाण आले होते.

गेल्या काही महिन्यांपूर्वी परिणीती आणि राघव चढ्ढा यांचा साखरपुडा झाला होता. त्याला बॉलीवूडच्या सेलिब्रेटींपेक्षा राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी जास्त गर्दी केली होती. कॉग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधी यांनी देखील उपस्थिती लावल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर परिणीती आणि राघव चढ्ढा यांना नेटकऱ्यांनी लग्नाच्या तारखेवरुन प्रश्न विचारुन भंडावून सोडले होते.

Also Read - हॅप्पी हार्मोन...

आता तर सोशल मीडियावर परिणीती आणि राघव यांच्या लग्नाची पत्रिका नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्यावरुन वेगवेगळया चर्चांना उधाण आले आहे. दिल्लीमध्ये त्यांचा साखरपूडा पार पडला होता. त्याच्या व्हायरल झालेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला होता. यावेळी परिणीतीची बहिण हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा अमेरिकेतून आली होती. यावेळी तिचा पती निक जोनास देखील हजर होता.

आता परिणीतीच्या लग्नाच्या पत्रिकेनं नेटकऱ्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरं देऊन टाकली आहेत. त्यात लग्न केव्हा, कुठे आणि किती वाजता आहे हे सांगून टाकलं आहे. परिणीती आणि राघव हे येत्या ३० सप्टेंबर रोजी लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. ते चंदीगडमधील ग्रँड ताज हॉटेलमध्ये लग्न करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आम्ही चढ्ढा कुटूंबीय आपल्या सर्वांना त्या ग्रँड वेडिंगसाठी निमंत्रित करतो आहोत. आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिणीती आणि राघव चढ्ढा हे पंजाबी पद्धतीनं लग्न करणार आहेत. ते राजस्थानमध्ये २३ आणि २४ डिसेंबर रोजी पंजाबी रीतिरिवाजानुसार लग्न करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. प्री वेडिंग कार्यक्रम हे २३ डिसेंबर रोजी होणार आहे. २४ डिसेंबर रोजी ते राजस्थानमधील उदयपूरमधील लीला पॅलेसमध्ये लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train: लोकलमधील AC १० मिनिटांपासून बंद, गुदमरून तीन प्रवाशी बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

Konkan Railway : बाप्पाच्या आगमनासाठी कोकणात कधी जायचंय? रेल्वे आरक्षणाचे संपूर्ण वेळापत्रक आले समोर, एका क्लिकवर पहा

आधी 'हनिमून'साठी सजावट, आता चक्क 'पुजा-अर्चा'; रेल्वेच्या डब्यांमध्ये नेमकं चाललंय तरी काय? VIDEO समोर...

Latest Marathi News Live Update : मृत वारकऱ्यांच्या नातेवाईकांना चार लाखाची मदत; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

Video : जगातला अनोखा विवाहसोहळा! दोन रोबोट्सनी केलं लग्न; खऱ्या वधू-वराप्रमाणे बांधली सात जन्माची गाठ, व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण

SCROLL FOR NEXT