Pathaan box office collection day 3: Shah Rukh Khan starrer mints Rs 300 crore worldwide sakal
मनोरंजन

PathanBox Office collection: जबरी कमाई! 'पठाण'नं तीन दिवसात जगभरातून कमावले 300 कोटी.. आणि भारतात..

'पठाण' करतोय विक्रमी कमाई.. लवकरच 500 कोटींचा अंदाज..

नीलेश अडसूळ

Shah Rukh Khan Pathan Worldwide Box Office collection Day 3:  शाहरुख खानचा 'पठाण' सिनेमा बॉक्स ऑफिस वर चांगलाच जलवा दाखवत आहे. पहिल्याच दिवशी पठाणने रेकॉर्ड ब्रेक कमाई करत 100 कोटींचा आकडा पार केला.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी थोडीशी उतरण पाहायला मिळाली. पण तिसऱ्या दिवसाअखेरी एक मोठी बातमी समोर आली आहे. शाहरुखच्या पठाणने जगभरातून तीन दिवसात 300 कोटींची कमाई केली आहे.

(Pathaan box office collection day 3: Shah Rukh Khan starrer mints Rs 300 crore worldwide)

हेही वाचा- ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

शाहरुखचा चाहतावर्ग जगभरात असल्याने भारतासह अनेक देशांत हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर पाहिला जात आहे. त्यामुळे या चित्रपट भारता इतकाच किंबहुना त्यापेक्षा जास्त जगभरात गाजत आहे.

अॅडव्हान्स बुकिंगमध्ये जादू दाखवलेल्या या सिनेमाने रिलीजच्या तीन दिवसांत जगभरातील अनेक बिग बजेट सिनेमांना मागे टाकलं आहे. आतापर्यंत या सिनेमाने एकूण 300 कोटींची कमाई केली आहे.

'पठाण' 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला, भारतातही या चित्रपटाने मोठी कमाई केली आहे. भारतात पहिल्या दिवशी 'पठाण'ने 55 कोटींची कमाई केली तर दुसऱ्या दिवशी 68 कोटींची कमाई केली. नंतर हा कल जरा मावळता दिसत आहे.

कारण तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने भारतात 35 कोटींची कमाई केली. 3 दिवसात या चित्रपटाने भारतात एकूण 158 कोटींचा गल्ला जमवला. 

सुरवातीला 'पठाण' हा सिनेमा चांगलाच वादात अडकला होता. त्यातील 'बेशरम रंग' या गाण्यातील भगव्या रंगाची बिकिनी घातली होती. त्यावरून या चित्रपटाला बराच विरोध झाला. अगदी चित्रपट बंद पाडण्याची मागणीही झाली.

त्यामुळे हा चित्रपट चालेल की नाही यात शंका होती. पण तीन दिवसात छप्पर तोड कमाई करून या चित्रपटाने विरोध करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: ५ पैकी ५... RCB कडे आहे असा खेळाडू जो देतो चॅम्पियन बनण्याची गॅरंटी! आजपर्यंत कधी हरला नाही T20 फायनल

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : पंजाब सरकारी कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानी मोर्चा

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

Mumbai News: मुंबईतील २५० अनधिकृत बांधकामांवर हातोडा, महापालिकेची धडक मोहीम

SCROLL FOR NEXT