मनोरंजन

‘बारा बाय बारा’ पिफमध्ये ठरला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट

आपल्या वेगळेपणासाठी नेहमीच चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक, जाणकार यांच्यासाठी पर्वणी असणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय़ पुरस्काराची आज सांगता झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

आपल्या वेगळेपणासाठी नेहमीच चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक, जाणकार यांच्यासाठी पर्वणी असणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय़ पुरस्काराची आज सांगता झाली आहे. यंदाच्या पिफमध्ये मराठी चित्रपटानं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामध्ये ‘बारा बाय बारा’ या मराठी चित्रपटाला यावेळच्या प्रभात सर्वोत्कृष्ठ चित्रपटानं गौरविण्यात आले आहे. दोन वर्षांच्या कालावधीनंतर पार पडलेल्या पिफला पुणेकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. मराठी चित्रपट हे यंदाच्या महोत्सवाचे वेगळेपण म्हणता येईल.

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १९ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यावर्षीचा प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट दिग्दर्शक पुरस्कार ‘बारा बाय बारा’ या भारतीय चित्रपटाचा दिग्दर्शक गौरव मदान याने पटकावला. रोख रूपये पाच लाख, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी डॉ. जब्बार पटेल, गौरव मदान आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख उपस्थित होते.

महोत्सवात मकरंद माने दिग्दर्शित ‘पोरगा मजेतंय’ या चित्रपटाने ‘संत तुकाराम सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट’ पुरस्कारावर आपली मोहोर उमटविली. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने रोख रूपये पाच लाख, मानचिन्ह व मानपत्र देऊन चित्रपटाच्या चमूला गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई बॉम्बे बोलेगा 'खलिस्तान झिंदाबाद'! महापालिकेसह शाळा बॉम्बने उडवण्याची धमकी

WhatsApp Update: 1 जानेवारी 2027 पासून WhatsApp, Snapchat, Telegram बंद होणार? SIM कार्डबाबत नवा नियम काय?

Marathi News Live Updates: माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सहकुटुंब बजावला पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क

Cancer Early Symptoms : शरीर देतंय हे गंभीर संकेत! कर्करोग होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'ही' 7 सुरुवातीची लक्षणे; वेळीच काळजी घ्या, अन्यथा...

Shiv Bhojan Scheme: शिवभोजन केंद्रांवर सीसीटीव्हींचा ‘वॉच! नवी नियमावली लागू; अनियमितता आढळल्यास केंद्रचालकांवर कारवाई

SCROLL FOR NEXT