SRK vs Prabhas: Shah Rukh Khan VS Prabhas Esakal
मनोरंजन

SRK vs Prabhas: 'किसमें कितना है दम' किंग खानच्या डंकीसोबत टक्कर घेणार प्रभास!

Vaishali Patil

Shah Rukh Khan VS Prabhas: सध्या मनोरंजन विश्वात शाहरुख खानच्या जवानची चर्चा आहे. या चित्रपटाने रिलिज होताच अनेक नवनवीन विक्रम केले आहेत. अजूनही या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये आहे.

यापुर्वी शाहरुख खानने चार वर्षानंतर 'पठाण' चित्रपटातुन बॉक्स ऑफिसवर एंट्री केली आणि धुमाकूळ घातला होता. शाहरुखच्या पठाण आणि जवान या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींचा टप्पा पार केला.

यासोबतच शाहरुख एका वर्षात सर्वात जास्त चित्रपटाची कमाई करणारा अभिनेता बनला. आता 'जवान'नंतर शाहरुख खान 'डंकी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुखचे चाहते त्याच्या या चित्रपटासाठी खुपच उत्सूक आहेत. शाहरुखचा हा चित्रपट येत्या ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. आता त्यातच एक मोठी बातमी समोर आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, साऊथ सुपरस्टार प्रभासचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'सालार' देखील ख्रिसमसच्या दिवशी रिलीज होण्याच्या तयारी आहे. इतकच नाही तर तो शाहरुख खानच्या 'डिंकी'ला टक्कर देणार अशीही माहिती समोर आली आहे.

भारतीय चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबद्दल माहीती दिली आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत याबद्दल सांगितले आहे. तरणने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'हो, हे खरं आहे. या ख्रिसमसमध्ये शाहरुख vs प्रभास, ' डंकी' vs 'सालार' असा सामना रंगणार आहे. सालार ख्रिसमसला 22 डिसेंबर 2023 रोजी चित्रपटगृहात रिलिज होणार आहे. याची अधिकृत घोषणा 29 सप्टेंबर 2023 रोजी होईल.

पुढे तरण आदर्श लिहितो की, ही दुसरी वेळ आहे जेव्हा HombaleFilms ची शाहरुखसोबत सोबत टक्कर होणार आहे. 2018 च्या सुरुवातीला शाहरुख खानचा झिरो चित्रपटाची यशच्या KGF चित्रपटासोबत टक्कर होणार आहे. मात्र यात शाहरुखचा 'झिरो' बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप गेला तर 'केजीएफ'ने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले.

सध्या सालार आणि डंकी या दोन्ही चित्रपटांची प्रेक्षकांमध्ये उत्सूकता आहे. शाहरुखचे मागील चित्रपट पाहता त्याच्या डंकीकडून प्रेक्षकांना चांगल्या अपेक्षा आहेत. तर दुसरीकडे प्रभासच्या चित्रपटाबाबत बोलायचं झालं तर त्याचे मागील काही सिनेमे काही खास कमाल करु शकलेले नाही त्यामुळे आता त्याचा सालार चित्रपट काय कमाल करतो याकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT