Salaar Box Office Collection Day 1 Esakal
मनोरंजन

Salaar Box Office Collection Day 1: सालारनं बॉक्स ऑफिस हादरवलं! पहिल्याच दिवशी रचला इतिहास; जाणून घ्या कलेक्शन

22 डिसेंबर रोजी 'सालार भाग-1 सीझफायर' थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.

Vaishali Patil

Salaar Box Office Collection Day 1: साऊथ सिनेसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांच्या यादीमध्ये प्रभासचं नाव घेतलं जातं. बऱ्याच दिवसांपासून चाहते प्रभासचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'सालार'च्या रिलीजच्या प्रतिक्षेत होते. अशा परिस्थितीत 22 डिसेंबर रोजी 'सालार भाग-1 सीझफायर' थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. आदिपुरुष फ्लॉप झाल्यानंतर प्रभासच्या चाहत्यांना सालारकडून खुप अपेक्षा होती आणि आता चाहत्यांची ही अपेक्षा पुर्ण झाल्याचे दिसत आहे.

प्रभास स्टारर सलारला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा प्रंचड प्रतिसाद मिळाला होता. यामुळे 'सालार'ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस पाडला आहे. प्रभासच्या या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी तगडी कमाई करत बॉक्स ऑफिसला हादरवलं आहे. आता सालारने रिलिजच्या पहिल्याच दिवशी किती कोटींची ओपनिंग केली ते जाणून घेऊया.

फ्लॉप चित्रपटाची रांग लागल्यानंतर प्रभासने सालारमधून जबरदस्त कमबॅक केलं आहे. Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'सालार' ने रिलीजच्या पहिल्या तब्बल 95 कोटींची ओपनिंग केली आहे.

ही प्राथमिक आकडेवारी असली तरी अधिकृत आकडेवारी आल्यानंतर यात काही बदल होऊ शकतात. सालारने तब्बल 95 कोटींची ओपनिंग दिल्याने आता पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर साउथ चित्रपटांनी वर्चस्व केल्याचे चित्र आहे. या आकडेवारीनुसार 'सालार'ने शाहरुखच्या डंकीचं नव्हे तर 'पठाण', 'जवान' चित्रपटांना देखील खुपच मागे टाकले आहे.

'सालार'ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 95 कोटींची ओपनिंग सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या ओपनिंग डेचा रेकॉर्ड मोडला आहे. वर्षाच्या अखेरीस प्रभासचा सालार या वर्षातील सर्वात मोठा ओपनर ठरला आहे.

शाहरुखच्या जवानाने पहिल्या दिवसाची कमाई 65.5 कोटींची ओपनिंग दिली होती तर पठाणने पहिल्या दिवशी 55 कोटी आणि अॅनिमलची पहिल्या दिवसाची कमाई 54.75 कोटी रुपये होती. त्यात आता प्रभासनं बाजी मारली आहे. हा तर केवळ पहिल्या दिवसाचा आकडा आहे. विकेंड पर्यंत चित्रपट किती कोटींची कमाई करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

'सालार' या पॅन इंडिया चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन आणि श्रुती हासन, जगपती बाबू रेड्डी यांच्यासह अनेक कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EL NINO IMPACT : 'सुपर एल निनो'चा भारतावर काय होणार परिणाम? गेल्या 7 दशकांतील सर्वात तीव्र हवामान बदलाचा इशारा; देशात माॅन्सूनचा पाऊस 14 टक्के कमी!

ढिंग टांग : डीजे : शाप की वरदान..!

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या लढ्यात जरांगे आक्रमक; उपमुख्यमंत्री शिंदे-खासदार जाधवांना निवडणुकीत जागा दाखवण्याचा इशारा

अर्थवेध : आमचं काय चुकलं?

करकायदा : कपात केलेला ‘टीडीएस’ जमा न केल्यास...

SCROLL FOR NEXT