Prajakta Mali: एक नाही तर तब्बल सतरा वेळा शाहरुखला धडकली प्राजक्ता, या सिनेमात केलंय काम SAKAL
मनोरंजन

Prajakta Mali: एक नाही तर तब्बल सतरा वेळा शाहरुखला धडकली प्राजक्ता, या सिनेमात केलंय काम

प्राजक्ता माळीला बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सोबत एका सिनेमात काम करण्याची सुवर्णसंधी मिळाली.

Devendra Jadhav

लोकप्रिय अभिनेत्री, डान्सर, निवेदिका प्राजक्ता माळी हिचं प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. प्राजक्ताने सोशल मीडियावर तिच्या आयुष्यातली एक गोड आठवण शेयर केली आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण प्राजक्ता माळीला बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सोबत एका सिनेमात काम करण्याची सुवर्णसंधी मिळाली. हा सिनेमा म्हणजे 'स्वदेस'.

प्राजक्ता माळीने तिच्या सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून हि आठवण शेयर केली आहे. प्राजक्ता माळीच्या एका फॅनने तिला सोशल मीडियावर एक फोटो सेंड केलेला. या फोटोत स्वदेस सिनेमातला एक प्रसंग आहे. या सीन मध्ये शाहरुख सोबत एक लहान मुलगी दिसतेय ती आहे प्राजक्ता माळी. या सिनसाठी प्राजक्ता एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल सतरा वेळा शाहरुखला धडकी दिली.

प्राजक्ताने या सीनच्या शुटिंगवेळी झालेल्या गमतीजमती शेयर केल्या. सिन असा आहे कि शाहरुख लायब्ररीमध्ये असतो आणि ती हिरोईन पत्ता सांगते त्याला आणि तो पत्ता लिहून घेते. ती त्याला पैसे देते आणि पुस्तकं घेते. पण त्याच्याकडे सुट्टे पैसे नसतात. तेवढ्यात ती निघून जाते. तेव्हा तो धावत धावत बाहेर येतो. आणि गडबडीत तो दोन मुलींना धडकतो. त्यापैकी एक मुलगी आहे प्राजक्ता.

हा सिन सहजासहजी शूट झाला नाहीये. या सिन साठी एकूण १७ रिटेक झाले. म्हणजेच एकूण १७ वेळा प्राजक्ता शाहरुखला धडकली. जेव्हा शाहरुख जवळ यायचा तेव्हा प्राजक्ता बाजूला जायची. पुढे शाहरुखनेच प्राजक्ताला जवळ बोलावून नीट समजावलं. आणि नंतर हा सिन व्यवस्थित शूट झाला. अशाप्रकारे स्वदेस सिनेमात प्राजक्ताला शाहरुख सोबत काम करण्याची संधी मिळाली.

प्राजक्ताने काहीच दिवसांपूर्वी अस्सल मराठमोळ्या अलंकारांची श्रीमंती, पारंपरिक, घरंदाज आभूषणांच्या नवीन वेबसाईटचे महाराष्ट्राचे नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच अनावरण करण्यात आले. 'प्राजक्तराज' असं या वेबसाईटचं नाव आहे. काहीच महिन्यांपूर्वी प्राजक्ताने 'प्राजक्तप्रभा' हे तिच्या कवितांचं पुस्तक प्रकाशित केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद होणार, गणेशोत्सवासाठी प्रशासनाची खबरदारी

Women’s Asia Cup 2026: टीम इंडिया जिंकली तर पुन्हा होणार ‘ट्रॉफी ड्रामा’? मोहसिन नकवी फायनलमध्ये येणार, गेल्या वर्षाची आठवण ताजी

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांना पाठिंब्यासाठी मोडनिंबमध्ये कडकडीत बंद

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर उपायासाठी हालचालींना वेग; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडच्या भूसंपादनाला गती

शिंदेंसेनेच्या नेत्याचा रुग्णालयात राडा! बिलावरून वाद, कर्मचाऱ्याला शिवीगाळ अन् मारहाण करत...; पालघरमध्ये काय घडलं?

SCROLL FOR NEXT