Prasad Oak Marathi Movie Actor Director Insta Post  esakal
मनोरंजन

Prasad Oak Post : 'वास्तूशांतीच्या दिवशी आमच्या घरी आलात अन्....' मुख्यमंत्री एकनाथ शिंदेविषयी बोलताना प्रसाद भावूक झाला!

प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेता प्रसाद ओक हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या पोस्टसाठी चर्चेत असणारा सेलिब्रेटी आहे.

युगंधर ताजणे

Prasad Oak Marathi Movie Actor Director Insta Post : प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेता प्रसाद ओक हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या पोस्टसाठी चर्चेत असणारा सेलिब्रेटी आहे. त्याच्या धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे नावाच्या चित्रपटानं मराठी प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले होते. आता त्याचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या सगळ्यात प्रसादनं इंस्टावर शेयर केलेली पोस्ट ही चर्चेत आली आहे. त्यामध्ये त्यानं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी व्यक्त केलेली भावना खूप काही सांगून जाणारी आहे. प्रसादच्या नव्या घराच्या वास्तुशांतीला मुख्यमंत्र्यांनी लावलेली हजेरी हा त्या पोस्टचा मुख्य विषय आहे. त्यामध्ये प्रसादनं मुख्यमंत्र्यांचे काही फोटो आणि व्हिडिओ शेयर केले आहेत.

प्रसादनं त्याची ती पोस्ट शेयर करताना म्हटले आहे की, माझ्यासारख्या एका छोट्या कलाकाराच्या विनंतीला मान देवून…तुम्ही दिलेला शब्द पाळलात आणि वास्तू शांतीच्या दिवशी आमच्या घरी आलात. अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आलात. कोणताही राजकारणी अविर्भाव न ठेवता अगदी कुटुंबातलेच असल्याप्रमाणे आमच्या सोबत बसलात,जेवलात..

नीट निरखून आख्खं घर पाहिलंत.. हा प्रसंग आमच्या सगळ्यांच्या मनावर कायमचा कोरला गेला आहे. आपले गुरु धर्मवीर आनंद दिघे साहेब, यांच्या पावलावर पाऊल टाकत आपण ज्या पद्धतीनी “माणूस” जोडता आहात ते पाहता “गुरुने दिला ज्ञानरुपी वसा…आम्ही चालवू हा पुढे वारसा” हे शब्द तंतोतंत खरे करताय असंच वाटलं..!! साहेब…मनःपुर्वक आभार…!!!

प्रसादच्या व्हायरल झालेल्या इंस्टावरील त्या पोस्टला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहेत. नेटकऱ्यांनी, चाहत्यांनी प्रसादला शुभेच्छा देत त्याचे कौतुक केले आहे. प्रसादच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास त्याचा धर्मवीरचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. त्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni on IPL 2027 : पुढे खेळायचं की नाही, डिसेंबरमध्ये निर्णय घेणार; महेंद्रसिंग धोनीने स्पष्ट केलं चित्र, तेव्हा असं नेमकं काय घडणार?

Crime News: दहा हजारांचे कर्ज, ७५ हजारांची मागणी; मायच्या काळजाचा तुकडा हरपला!

Bay of Bengal Cyclone : बंगालच्या उपसागरात तीव्र चक्रीवादळाचे संकेत; राज्यात पावसाचा अलर्ट, अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट

New Zealand T20I Squad Update: सलग दोन पराभव अन् न्यूझीलंड संघात उलथापालथ; भारताला हरवण्यासाठी धडाधड निर्णय

Beed Crime : बीडमध्ये पवनचक्की प्रकल्पाचे काम अडवून १० लाखांची खंडणी; ७ जणांविरुद्ध नेकनूर पोलिसांत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT