preetam marathi movie 
मनोरंजन

खऱ्या आणि निखळ प्रेमाची झलक 'प्रीतम'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - व्हॅलेंटाईन डे ला अनेक रोमॅंटिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतात. प्रेमात पडलेल्या प्रत्येकालाच असे चित्रपट पहायला आवडतात. आपल्या पर्टनरसोबत अनेक जण व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी फिल्म डेटला  जातात. असाच एक रोमॅंटीक चित्रपट या व्हॅलेंटाईन डे ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

प्रेमाचा अनोखा प्रवास 'प्रीतम' 
प्रत्येक जण एकदा तरी प्रेमात पडतोच. त्यावेळी जी भावना असते ती भावना 'प्रितम' या चित्रपटातून मांडली आहे. एखादी अनोळखी व्यक्ती आपल्याला आवडायला लागते त्यानंतर त्याचे रूपांतर प्रेमात होते. असा या प्रेमाचा सुंदर प्रवास या चित्रपटात दाखवला आहे.प्रितम चित्रपटाची कहाणी एका प्रेमी युगलाची आहे. जे एकमेकांसाठी काहीही करू शकतात. खऱ्या आणि निखळ प्रेमाची झलक या चित्रपटात दिसणार आहे. 

प्रणव आणि नक्षत्राचा रोमॅंटीक अंदाज 
चित्रपटात प्रणव रावराणे  आणि नक्षत्र मेढेकर ही जोडी प्रमुख भुमिकेत दिसणार आहे. पहिल्यांदाच या दोघांची जोडी एकत्र प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांच्यासोबत उपेंद्र लिमये,समीर खांडेकर, आनंदा कारेकर,नयन जाधव,विश्वजीत पालव हे प्रसिध्द कलाकार या चित्रपटामध्ये दिसणार आहे. 

कोणातील निसर्गरम्य वातावरणात या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. सिजो रॉकी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून विझार्ड प्रोडक्शनच्या फैजल नितीन सिजो यांनी या चित्रपटाची निर्मीती केली आहे. या चित्रपटात मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द अभिनेता उपेंद्र लिमये हा संगितकाराच्या भुमिकेत दिसणार आहे. व्हॅलेंटाईन डे ला म्हणजेच १९ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: मोदींचा राहुल गांधींवर हल्ला! म्हणाले, त्यांचा एकच पेटंट डायलॉग असतो.. 'याची काय गरज होती?'

Accident : थेऊर फाटा येथे ट्रक अपघातात जखमी तरुणाचा मृत्यू; रक्षाबंधन उरकू‌न घरी जाताना झाला होता अपघात

IND vs PAK Asia Cup: भारताची विजयी हॅटट्रिक! ९ षटकांत जिंकली मॅच, पाकिस्तानची इतकी वाईट अवस्था कधी झालीच नव्हती

Pune Dahihandi : दहीहंडीत डीजेचा आवाज ९० डेसिबलपर्यंत; नियमांची मर्यादा ओलांडली

डीजेवर नाचतानाचा VIDEO व्हायरल; विद्यानंद बापट म्हणाले, ‘बघणाऱ्यांची कीव येते’

SCROLL FOR NEXT