Priya Bapat esakal
मनोरंजन

Priya Bapat: प्रिया बापट 'रात जवान है' मधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार शो

Priya Bapat: प्रिया ही 'रात जवान है' या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'रात जवान है' या शोच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.

priyanka kulkarni

Priya Bapat: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापटनं (Priya Bapat) हिंदी मनोरंजनसृष्टीत देखील विशेष स्थान निर्माण केलं आहे. प्रियाच्या सिटी ऑफ ड्रीम्स या हिंदी वेब सीरिजला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता प्रिया ही 'रात जवान है' या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'रात जवान है' या शोच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.

'रात जवान है' या शोची स्टार कास्ट

'रात जवान है' या शोमध्‍ये बरूण सोबती, अंजली आनंद आणि प्रिया बापट यांसारखे प्रतिभावान कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. यामिनी पिक्‍चर्स प्रायव्‍हेट लि‍मिटेड निर्मित आणि प्रतिभावान सुमीत व्‍यास यांचे दिग्‍दर्शन असलेली हा शो प्रेक्षकांना मैत्री, पालकत्‍व आणि उत्‍साही आणि साहचर्याच्‍या क्षणांनी भरलेल्‍या आधुनिक जीवनातील आव्‍हानं या गोष्टी दाखवते.

प्रिया बापटनं नुकतेच 'रात जवान है' या सेटवरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, "यारा ओ यारा मिलना हमारा जाने क्या रंग लाए गा". आता प्रियाच्या आगामी शोची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

उत्‍साहपूर्ण ट्विस्‍ट असलेल्‍या 'रात जवान है' शोचे दिग्‍दर्शन करण्‍याबाबत आपला आनंद व्‍यक्‍त करत दिग्‍दर्शक सुमीत व्‍यास म्हणाले, 'कुटुंबाची जबाबदारी पडली की, तारूण्‍य संपले असा जगातील सर्वांचा समज आहे. 'रात जवान है' या गोष्टीचे खंडन करते.ही तीन मित्रांची कथा आहे, जे मुले झाल्‍यानंतर देखील त्‍यांच्‍यामधील मैत्री, व्‍यक्तिमत्त्व आणि विलक्षणपणा कायम ठेवण्‍यासाठी सर्वोतोपरी प्रयत्‍न करतात.आम्‍ही सेटवर खूप धमाल करत आहोत, तसेच या तिघांसोबत काम करताना खूप धमाल येते.'

प्रिया बापटनं अनेक मालिका, नाटक आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. प्रिया ही वजनदार, टाइमपास 2,आंधळी कोशिंबीर, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या सिनेमांमध्ये काम केलं आहे.लगे राहो मुन्ना भाई आणि मुन्ना भाई एम.बी.बी.एस या हिंदी चित्रपटांमधून देखील प्रिया प्रेक्षकांच्या भेटीला आली. आता प्रियाच्या आगामी प्रोजेक्ट्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT