Priyanka Chopra Cousin Mannara Chopra Esakal
मनोरंजन

Mannara Chopra: प्रियांका चोप्राच्या बहिणीसोबत दिग्दर्शकाचे गैरवर्तन! व्हिडिओ व्हायरल नेटकऱ्यांचा संताप..

Vaishali Patil

Priyanka Chopra Cousin Mannara Chopra: बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाने वेगळं स्थान निर्माण करणारी ग्लोबल स्टार प्रियंका चोप्राही आता हॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. मात्र सध्या प्रियंका नाही तर तिची चुलत बहिण चर्चेत आली आहे. प्रियांका चोप्राच्या आते बहिणीसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे.

2014 साली तेलुगू फिल्म इंडस्ट्रीत आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणारी मन्नारा चोप्रा ही दक्षिणेतील एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. पण गेल्या दिवसापासून मन्नारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

सध्या मन्नारा ही तिच्या आगामी 'थिरागाबादरा सामी' या चित्रपटात व्यस्त आहे. तिच्या या चित्रपटाचे प्रमोशन सध्या सुरु आहे. त्यातच आता या प्रमोशन दरम्यान तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओत एका कार्यक्रमादरम्यान दक्षिणेकडील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक ए.एस. रवि कुमार चौधरी यांनी मन्नाराला किस केले आहे.

त्याने अचनाक असं वर्तन केल्यानंतर काहीवेळासाठी मन्नारा खुप घाबरली होती. ती किती अस्वस्थ झाली हे या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

साऊथ फिल्म इंडस्ट्रीचे दिग्दर्शक रवि कुमार चौधरी मन्नारा चोप्राच्या गालावर किस केले. हा व्हिडिओ समोर येताच नेटकरी भडकले.

अभिनेत्रीसोबत दिग्दर्शकाने केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांनी रवि कुमार यांना चांगलच ट्रोल केले जात आहे.

हे लैंगिक छळाचे प्रकरण असून मन्नाराने त्याच्याविरोधात तक्रार करावी अशी मागणी तिचे चाहते करत आहेत. तर काहींना या प्रकरणावरुन Metoo ची आठवण झाली आहे.

मन्नारा वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर प्रियांका चोप्राची आते बहिणीने असलेल्या मन्नाराने 2014 साली प्रेम गेमा जानथा नई या चित्रपटाद्वारे तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

त्यानंतर तिने बॉलिवूड सिनेमा जिद मध्येही काम केलं आहे. संदामारुथम (2015) आणि जक्कन्ना (2019) काम केले आहे. आता ती ‘तिरागाबादरा सामी’ हा तेलुगू चित्रपटातुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flight Incident: 180 प्रवाशांचा जीव... '9/11' सारख्या हल्ल्याचा धोका; फ्लायदुबईच्या भारतीय कॅप्टनमुळे टळला मोठा अपघात, नेमकं काय घडलं?

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात ठाण्यात तणाव; आदित्य ठाकरे, संजय राऊत कापूरबावडी पोलिस ठाण्यात

Pune Solapur Highway Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव टँकरचा थरार; दुचाकीला धडक देऊन चालक फरार, २१ वर्षीय तरुण ठार

Latest Marathi News Live Update : शेखर गोरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

SCROLL FOR NEXT