meera chopra, priyanka chopra esakal
मनोरंजन

Meera Chopra: प्रियांका चोप्राची बहीण केजरीवालांची सून होणार; लग्नाच्या पत्रिकेचा फोटो व्हायरल

प्रियांकाची चुलत बहीण मिरा चोप्रा (Meera Chopra) ही लवकरच रक्षित केजरीवालसोबत (Rakshit Kejriwal) लग्नगाठ बांधणार आहे.

priyanka kulkarni

Meera Chopra : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राची (Priyanka Chopra) बहीण परिणीती चोप्रानं (Parineeti Chopra) काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. परिणीती आणि राघव यांचा विवाह सोहळा धुमधडाक्यात पार पडला. अशताच आता प्रियांकाची आणखी एक बहीण लग्न करणार आहे. प्रियांकाची चुलत बहीण मिरा चोप्रा (Meera Chopra) ही लवकरच रक्षित केजरीवालसोबत (Rakshit Kejriwal) लग्नगाठ बांधणार आहे.

लग्नाच्या पत्रिकेचा फोटो व्हायरल

मिरा चोप्रा ही तिचा बॉयफ्रेंड रक्षित केजरीवालसोबत लग्न करणार आहे. मिरा चोप्रा आणि रक्षित केजरीवाल यांच्या लग्नाच्या पत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये मिरा आणि रक्षित यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्स आणि लग्नाची माहिती आहे.

मिरा चोप्राच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला 11 मार्चपासून सुरुवात होणार आहे. मीरा आणि रक्षित यांच्या मेहंदी सोहळ्यानंतर संगीत आणि कॉकटेल नाईट असणार आहे. 12 मार्च रोजी दिवसभर हळदी समारंभ होईल आणि त्यानंतर संध्याकाळी मीरा आणि रक्षित यांची वरात असणार आहे. जयपूरमधील कुंडा येथील एका आलिशान हॉटेलमध्ये मिरा आणि रक्षित यांचे लग्न होणार आहे.

मिरा आणि रक्षित जयपूरमध्ये बांधणार लग्नगाठ (Meera Chopra And Rakshit Kejriwal Wedding)

2018 मध्ये प्रियांका चोप्राने निक जोनाससोबत जोधपूरच्या उम्मेद भवनमध्ये लग्न केले. तर गेल्या वर्षी परिणीती चोप्राने राघव चढ्ढासोबत उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधली. प्रियांका आणि परिणीतीप्रमाणे मीरा चोप्राही राजस्थानमध्ये लग्न करणार आहे. जयपूरमध्ये ती रक्षितसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

Meera Chopra And Rakshit Kejriwal Wedding card
Meera Chopra And Rakshit Kejriwal Wedding card

जाणून घ्या मिरा चोप्राबद्दल (Know About Meera Chopra)

'अंबे आरुयरे' या तमिळ चित्रपटातून मिरानं अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. मीरा चोप्राने बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. तिने'1920 लंडन', 'सफेद', 'सेक्शन 375' आणि 'गँग ऑफ घोस्ट' या हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. मिरा चोप्रा ही सोशल मीडियावर विविध लूकमधील फोटो शेअर करत असते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. मिराला सोशल मीडियावर 507k फॉलोवर्स आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Buses Crash : गुजरातमधील सुरतमध्ये भीषण बस अपघात; महाराष्ट्रातील दोन बसेसची समोरासमोर जोरदार धडक, सहा जणांचा मृत्यू

MP Supriya Sule : गुन्हेगारी कमी झाल्याचे पत्र शहा-फडणवीसांना पाठवा! पोलिस आयुक्तांनी पाठविलेल्या पत्रावर सुप्रिया सुळे यांचा पोलीस आयुक्तांना टोला

Latest Marathi News Live Update : सुरतमध्ये दोन बसची धडक: 6 जणांचा मृत्यू

Monsoon: काही तास बाकी! लवकरच मान्सून केरळात धडकणार, राज्यात जोरदार पाऊस पडणार; हवामान विभागाचा इशारा

IPL 2026: RCB च्या विजयाच्या सेलिब्रेशनमध्ये विराटची भुवनेश्वर कुमारसोबत फुगडी; Viral Video ने वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT