Chandramukhi 2  Esakal
मनोरंजन

Chandramukhi 2: थलैवाचा हात डोक्यावर ! 'चंद्रमुखी 2' च्या रिलिजपुर्वी रजनीकांतला केला साष्टांग दंडवत! व्हिडिओ व्हायरल

Vaishali Patil

गेल्या काही दिवसांपासून साउथमध्ये एका चित्रपटाची चर्चा आहे. तो म्हणजे कंगना राणौत आणि राघव लॉरेन्स स्टारर 'चंद्रमुखी 2'. हा सिनेमा येत्या 28 सप्टेंबर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र हा केवळ एकच चित्रपट या दिवशी रिलिज होणार नसून याच दिवशी म्हणजे 28 सप्टेंबर रोजी बॉक्स ऑफिसवर तीन सिनेमांची टक्कर होणार आहे.

या दिवशी विवेक अग्निहोत्रीचा 'द व्हॅक्सिन वॉर', रिचा चढ्ढा आणि पुलकित सम्राट यांचा कॉमेडीचित्रपट 'फुक्रे 3' आणि कंगनाचा 'चंद्रमुखी 2' देखील थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. त्यामुळे आता या तिन्ही चित्रपटांपैकी कोणता सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सध्या कंगना आणि राघव त्याच्या चंद्रमुखी 2 या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. आता त्यातच राघवने चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी पुर्वी साउथचे सुपरस्टार थलैवा रजनीकांत यांची भेट घेतली. यावेळी त्याने त्याच्या चंद्रमुखी 2 या चित्रपटासाठी आशीर्वाद घेतला. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर करत राघवने ट्विटमध्ये लिहिले की, "जेलरच्या यशाबद्दल अभिनंदन करण्यासाठी आणि 28 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या चंद्रमुखी 2 साठी आशिर्वाद घेण्यासाठी आज मी माझे गुरू रजनीकांत यांना भेटलो. मी खूप आनंदी आहे. थलैवा नेहमीच महान आहेत."

पी.वासू यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या चंद्रमुखी 2 या चित्रपटाचा पहिला प्रेक्षकांना खुप आवडला होता. हा एक हॉरर टच कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाच्या प्रीक्वलमध्ये ज्योतिका मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत होती.

तर दुसऱ्याभागात ही भुमिका कंगना साकारणार आहे. तर 'चंद्रमुखी 2' कंगना रणौत आणि राघव लॉरेन्सची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर दिसणार आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये खुप उत्सूकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT