Rajshri Deshpande Sacred Games Actress Nawazuddin Siddhiqui esakal
मनोरंजन

Rajshri Deshpande : 'नवाझुद्दीन सोबत तो सीन केला अन् मला....' 'सेक्रेड गेम्स' च्या राजश्री देशपांडेनं सांगून टाकलं!

अनुराग कश्यप दिग्दर्शित सेक्रेड गेम्सची लोकप्रियता अद्याप कायम आहे.

युगंधर ताजणे

Rajshri Deshpande Sacred Games Actress Nawazuddin Siddhiqui : अनुराग कश्यप दिग्दर्शित सेक्रेड गेम्सची लोकप्रियता अद्याप कायम आहे. या मालिकेत नवाझुद्दीन सिद्धीकीसोबत महत्वाची भूमिका साकारलेल्या राजश्री देशपांडेची त्या एका सीनमुळे जोरदार चर्चा झाली होती. राजेश्वरीनं एका मुलाखतीतून त्यावर व्यक्त केलेलं मत खूप काही सांगून जाणारे आहे.

राजश्रीनं झूम टीव्हीसोबत बातचीत केली. यावेळी तिनं इंटिमेट सीन्स आणि ते शुट करताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी लागते याविषयी सांगितले आहे. त्यात तिनं सेक्रेड गेम्समधील त्या सीनचे उदाहरण दिले आहे. सोशल मीडियावर तो सीन खूपच व्हायरल झाला होता. तिचे सीन्स फक्त व्हायरल झाले नव्हते तर त्यासोबत छेडछाड देखील झाली होती.

यानंतर राजश्रीनं सांगितलेला अनुभव मात्र फारच भयानक होता. ती म्हणाली, सेक्रेड गेम्समधील तो सीन केल्यानंतर मला ज्या चित्रपटांची ऑफर आली ती खूपच बोल्ड होती. त्यातही मी त्याच प्रकारचे सीन्स करावेत अशी प्रोड्युसर्सची इच्छा होती. मला डोळ्यासमोर ठेवून स्क्रिप्टही लिहिण्यात आली होती.

मी जेव्हा सेक्रेड गेम्समधील तो सीन शुट करत होते तेव्हा दिग्दर्शक अनुराग कश्यप, डीओपी होते. नवाझुद्दीनही होता. मी तो सीन केला म्हणून मला सगळे विचारत आहेत. दिग्दर्शकानं तो का केला हे त्याला कुणी विचारत नाही. डीओपीनं तो का शुट केला हेही विचारले जात नाही. तसेच एडिटरलाही विचारले जात नाही की त्यावेळी त्यानं तो सीन का नाही डिलीट केला,

मला खूप आनंद झाला जेव्हा मी ती सुभद्राची भूमिका साकारली होती. मला त्या सीन वरुन खूप ट्रोलही करण्यात आले होते. पण तो माझा निर्णय होता. त्यावरुन प्रत्येकवेळी मी उत्तरं देण्यात काय अर्थ आहे, माझ्यावर अश्लीलतेचा ठपकाही ठेवण्यात आला. त्यामुळे मी नवाझुद्दीनसोबत तो सीन केला याचा मला काही अंशी का होईना पश्चातापही होतो आहे. अशा शब्दांत राजश्रीनं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राजश्रीनं यावेळी तिला ट्रोल करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. तिनं म्हटलं की, दुर्देवाची गोष्ट आहे जेव्हा लोकं पीरियड्स सारख्या विषयांवर बोलायला मागे पुढे पाहतात. आणि सेक्सवर मात्र वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देतात. आपण फार वेगळ्या प्रकारे विचार करतो. यामुळे त्या गोष्टींविषयीचे गैरसमज आपल्या मनात येऊ लागतात. असेही राजश्रीनं म्हटले आहे.

राजश्री देशपांडे विषयी सांगायचे झाल्यास तिनं तलाश नावाच्या चित्रपटापासून करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर तिनं काही टीव्ही मनोरंजन मालिकांमध्ये देखील छोट्या छोट्या भूमिका साकारल्या होत्या. यात कुछ तो लोग कहेंगे आणि २४ इंडिया या शो चा उल्लेख करावा लागेल. याशिवाय तिनं सलमान खानच्या किकमध्ये देखील छोटीशी भूमिका साकारली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT