Rakul Preet Singh And Jackky Bhagnani wedding esakal
मनोरंजन

Rakul Preet Singh And Jackky Bhagnani: 'शुभमंगल सावधान', गोव्यात थाटामाटात पार पडला रकुल आणि जॅकी यांचा विवाह सोहळा!

Rakul Preet Singh And Jackky Bhagnani: विवाह सोहळ्यासाठी रकुल आणि जॅकी यांनी खास लूक केला.

priyanka kulkarni

Rakul Preet Singh And Jackky Bhagnani: अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) आणि अभिनेता जॅकी भगनानी (Jackky Bhagnani) यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला आहे. विवाह सोहळ्यासाठी रकुल आणि जॅकी यांनी खास लूक केला. गोव्यात थाटामाटात रकुल आणि जॅकी यांचा विवाह सोहळा पार पडला.

रकुल आणि जॅकी यांच्या विवाह सोहळ्याला यांच्या कुटुंबियांनी तसेच त्यांच्या मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती. रकुल आणि जॅकी यांनी पंजाबी आणि त्यानंतर सिंधी रितीरिवाजानुसार विवाह केला.

रकूल अन जॅकीच्या शाहीविवाह सोहळ्याची सोशल मीडियावर जोरदार (Rakul jackky Wedding Goa) चर्चा होती. त्या लग्नातील शाही मेजवानीची, पाहुण्यांसाठी असणाऱ्या वेगवेगळ्या नियमावलींची, दोन वेगवेगळ्या प्रकारे पार पडणाऱ्या विवाहसमारंभाची, इको फ्रेंडली विवाह सोहळ्याची उत्सुकता चाहत्यांना होती.

रकूल आणि जॅकीनं लग्नाला जे पाहुणे येणार आहेत त्यांच्यासाठी वेगळ्या नियम व अटी लागू केल्या होत्या. आलेल्या पाहुण्यांनी मोबाईलचा वापर करण्याची परवानगी नव्हती. त्यांनी फोटो काढून तो सोशल मीडियावर पोस्ट करायचा नाही. प्रायव्हसी जपण्यासाठी शक्य तेवढी काळजी या निमित्तानं घेतली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली होती.

जॅकीचे चित्रपट

2009 मध्ये कल किसने देखा या चित्रपटाद्वारे जॅकीने अभिनयात पदार्पण केले, 2011 मध्ये रिलीज झालेल्या F.A.L.T.U या चित्रपटात देखील त्यानं काम केलं. तसेच Mitron या चित्रपटात मुख्य भूमिका केली.

रकुलचे चित्रपट

'यारीया'या चित्रपटामधून रकुलनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.किक २ (२०१५), ब्रुस ली - द फॅटर (२०१५), नन्नकु प्रेथो (२०१६), सारणदोडू (२०१६) या चित्रपटात तिनं प्रमुखस भूमिका साकारली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात बेसिक पे 69000 रुपये, वार्षिक वाढ 6 टक्के; 51 पानांचं निवेदन

Radhanagari Bee Attack: रक्षाविसर्जनाला कावळ्याची वाट पाहणं पडलं महागात! कावळ्यासोबत मधमाशा आल्या अन्; १०० जखमी तर १२ गंभीर, लोकांना पळता भुई थोडी, व्हिडिओ व्हायरल

Ruturaj Gaikwad: 'काळजी नको, लवकरच मी...', ऋतुराज खराब फॉर्मवर स्पष्ट बोलला; CSK च्या खराब फिल्डिंगबद्दल काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update: दहीसरमध्ये तरुणीला अमानुष मारहाण

चौधरी बिहारचे नवे 'सम्राट', मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ; दोन उपमुख्यमंत्र्यांचाही शपथविधी, नितीशकुमार उपस्थित

SCROLL FOR NEXT