ram charan
ram charan  Sakal
मनोरंजन

Ram Charan: राम चरण आता थेट हॉलिवूडमध्ये! अभिनेत्यानचं दिला इशारा

सकाळ डिजिटल टीम

तेलुगू स्टार राम चरण आजकाल ऑस्करमध्ये त्याच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'RRR' च्या विजयाचा आनंद साजरा करत आहे. मार्च 2022 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडले.

विजेते एमएम कीरावानी, चंद्र बोस, दिग्दर्शक एसएस राजामौली, राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्यासह संपूर्ण 'आरआरआर' टीम लॉस एंजेलिसमधील अकादमी पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाली होती. नुकतेच राम चरण विजयानंतर भारतात परतले आणि त्यांनी मीडियाची भेट घेतली. येथे त्याने हॉलिवूड पदार्पणाचे संकेत दिले.

मीडिया संवादादरम्यान राम चरणला त्याच्या हॉलिवूड पदार्पणाबद्दल विचारण्यात आले. अभिनेत्याने काही विशिष्ट खुलासा केला नसला तरी, त्याने काहीतरी साइन करण्याचा इशारा नक्कीच दिला आहे. मला माहीत नाही, असे म्हणत त्यांनी प्रश्न टाळला. "त्यावर आम्ही काम करत आहोत. पण, हे आताच सांगणे घाईचे आहे. सर्व काही एक प्रक्रिया आहे. हे नक्कीच होईल. माझी आई म्हणते की नजर लावू नये. प्रत्येकाला अशा उद्योगात काम करण्याची इच्छा असते जिथे प्रतिभेचे कौतुक केले जाते".

अमेरिकेतही एका मुलाखतीदरम्यान राम चरणने हॉलिवूड चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. इथेही त्यांनी एक मोठा प्रोजेक्ट हातात असल्याचा इशारा दिला होता. राम आता परदेशी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने जगभरातील चाहत्यांना किती भुरळ घालतोय हे पाहावं लागेल. तूर्तास, आम्ही त्याच्या अधिकृत घोषणेची वाट पाहत आहोत.

राम चरण सध्या त्याच्या आगामी चित्रपट RC15 च्या अंतिम टप्प्याच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट जानेवारी 2024 मध्ये थिएटरमध्ये दाखल होणार आहे. यात कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच त्याने कर्नूलमध्ये चित्रपटाच्या एका महत्त्वाच्या शेड्यूलचे शूटिंग पूर्ण केले. याशिवाय राम चरण सलमान खानच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातही छोटी भूमिका साकारताना दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

Swapnil Joshi: स्वप्नील जोशीच्या मुलांचा 'नाच गं घुमावर' भन्नाट डान्स; पहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT