Ram Gopal Verma Exclusive Interview- 'Ladki-Girl Dragon' Movie Google
मनोरंजन

Exclusive:'सिनेमातील राजकीय हस्तक्षेप...'; राम गोपाल वर्मा स्पष्टच बोलले

सकाळ डिजिटलला दिलेल्या मुलाखतीत प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी आपल्या आगामी 'लडकी-गर्ल ड्रॅगन' सिनेमाच्या निमित्तानं संवाद साधला आहे.

प्रणाली मोरे

'सत्या','रंगीला','सरकार','भूत','कम्पनी' असे वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे बनवणारे राम गोपाल वर्मा आता 'लडकी: गर्ल ड्रॅगन' हा सिनेमा घेऊन आपल्या भेटीस येत आहेत. १५ जुलै रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे चीनी भाषेतही हा सिनेमा डब करण्यात आला असून चीनमधील ४० हजार स्क्रीनवर प्रदर्शित केला जाणार आहे. चीननं यासाठी राम गोपाल वर्मांशी (Ram Gopal Verma)मैत्रीचा हात मिळवल्याचं त्यांनी सांगितलं. या सिनेमाच्या निमित्तानं सकाळ UNPLUGGED ला दिलेल्या मुलाखतीत राम गोपाल वर्मा यांनी राजकारण,ट्रोलिंग,साउथ सिनेमावरुन रंगलेला वाद अशा अनेक गोष्टींवर मोकळेपणाने आपली मतं मांडली आहेत. त्या मुलाखतीची लिंक बातमीत जोडलेली आहे. (Ram Gopal Verma Exclusive Interview- 'Ladki-Girl Dragon' Movie)

या मुलाखतीत राम गोपाल वर्मा यांनी सिनेमातील राजकीय हस्तक्षेप यावर भाष्य करताना एकाच वाक्यात स्पष्ट आपलं मत मांडलं आहे. तसंच आपला सिनेमा चीन मध्ये रिलीज होतोय,आपल्या सिनेमाला चीननं सहकार्य केलंय कारण तो ब्रुसलीवरचा सिनेमा आहे पण भारत-चीनमध्ये सुरु असलेल्या संघर्षावरही यावेळी बोलायला दिग्दर्शक विसरला नाही. राम गोपाल वर्मा यांची ती स्पष्ट वक्तव्य ऐकण्यासाठी बातमीत जोडलेली मुलाखत नक्की ऐका.

राम गोपाल वर्मा यांच्या 'लडकी -गर्ल ड्रॅगन' सिनेमातील मुख्य अभिनेत्री ही पुण्याची मराठी मुलगी आहे. तसं पाहिलं तर उर्मिला मातोंडकर,अंतरा माळी यांचं बॉलीवूडमध्ये नाव मोठं होण्यात राम गोपाल वर्मा यांचा देखील महत्त्वाचा वाटा आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आता मराठमोळया पूजा भालेकरलाही वर्मांनी संधी दिली आहे. यावेळी मराठी अभिनेत्रीला आपल्या सिनेमात संधी देण्यामागचं नेमकं कारण काय याविषयी देखील राम गोपाल वर्मा मोकळेपणाने बोलले आहेत. आपल्यावर होणाऱ्या ट्रोलिंगविषयी देखील राम गोपाल वर्मा मुलाखतीत व्यक्त झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad Crime: कऱ्हाडला ड्रग्जप्रकरणी तिघांना अटक; पावणेतीन लाखांचे एमडी जप्त, २५ लाखांचा अन्य ऐवजही ताब्यात

Washing Machine Tips : क्षमतेपेक्षा जास्त कपडे भरल्यास खराब होऊ शकते वॉशिंग मशीन; एका वेळी किती कपडे धुवावेत? जाणून घ्या

Pune weather: जूनच्या स्वागताला पावसाची चाहूल; पुण्यात मेघगर्जना आणि विजांचा इशारा, नैऋत्य मोसमी पावसाची प्रगती

IPL 2026: RR चा फक्त १ कोटीचा जुगार; १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने ३३.८७ कोटींचा नफा कसा कमावला? पाहा संपूर्ण गणित

Ahilyanagar Crime: अहिल्यानगरात थरारक घटना; मुरुम चोरी उघडकीस आणणाऱ्या तरुणांचा पाठलाग जीवावर बेतला, जेसीबीच्या धडकेत एकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT