'Ram Teri Ganga Maili' star Mandakini all set to make a comeback after 26 years Google
मनोरंजन

'राम तेरी गंगा मैली' च्या मंदाकिनीचं कमबॅक; धमाकेदार एन्ट्रीनं वेधणार लक्ष

१९९६ मध्ये आलेल्या 'जोरदार' सिनेमातून मंदाकिनी शेवटची दिसली होती.

प्रणाली मोरे

राज कपूर यांचा 'राम तेरी गंगा मैली' (Ram Teri Ganga Maili) सिनेमातील प्रत्येक सीन आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. धबधब्याखाली पांढऱ्या शुभ्र साडीतील मंदाकिनीचा चेहरा तर चाहत्यांच्या मनावर अक्षरशः कोरला गेलाय. पण अर्थात सर्वांनाचा हा प्रश्न पडला होता की मंदाकिनी आहे कुठे? आता कशी दिसतेय? पण आता मंदाकिनीच्या(Mandakini) सगळ्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. मंदाकिनीच्या गाण्याचं पोस्टर समोर येताच तिचे चाहते मात्र भलतेच खूश झाले आहेत.('Ram Teri Ganga Maili' star Mandakini all set to make a comeback after 26 years)

अभिनेत्री मंदाकिनी पुन्हा एकदा आपल्या अदांनी लोकांना घायाळ करण्यासाठी सज्ज झाली आहे. होय,मंदाकिनी मनोरंजन क्षेत्रात एका म्युझिक व्हिडीओच्या माध्यमातून Maa O Maa मधून कमबॅक करत आहे. तिच्या गाण्याचं पहिलं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे.

मंदाकिनीला शेवटचं पाहिलं होतं ते साल १९९६ मध्ये आलेल्या 'जोरदार' सिनेमात. तब्बल दोन दशकांनी मंदाकिनी पुन्हा एकदा फिल्मी दुनियेत धमाकेदार एन्ट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे. यावेळी ती आपला मुलगा रब्बिल ठाकूरसोबत मनोरंजन जगतात पाऊल ठेवतेय.

मंदाकिनीला आजही 'राम तेरी गंगा मैली' या तिच्या सिनेमासाठी ओळखलं जातं. मंदाकिनीनं या सिनेमात ज्या पद्धतीनं भू्मिका साकारली होती त्यामुळे चाहत्यांच्या ती आजही लख्ख लक्षात आहे. अभिनेत्रीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या गाण्याचं पहिलं पोस्टर शेअर केलं आहे. या गाण्यात मंदाकिनी सोबत तिचा मुलगा रब्बिल ठाकूर देखील दिसणार आहे. मंदाकिनीच्या या गाण्याचं दिग्दर्शन सजन अग्रवालनं केलं आहे. त्यानंच गाण्याचे शब्द लिहिले आहेत. आता हे गाणं रिलीज झाल्यावर चाहते आपल्या लाडक्या अभिनेत्रीचं कसं स्वागत करतायत आणि गाण्याला कशी पसंती देतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT